राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा.

राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा.
पत्रकारांनी बातम्यांचा समतोल राखला पाहिजे धर्म कार्यात पत्रकारांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच आज देशद्रोही जिहादी प्रवृत्त्या थोड्याशा का होईना शांत झाल्या आहेत नाहीतर देशात अराजकता पसरवून देशाला अस्थिर करण्याचा त्यांचा डाव यशस्वी झाला असता असे मत पतीत पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि तालुका टॅक्सी युनियनचे अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी व्यक्त केले आहे.*
राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार सन्मान दिन नुकताच उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ पत्रकारांचे स्वागत केले.याप्रसंगी बोलतांना मुथा म्हणाले की,तीस वर्षांपूर्वी माझ्यावर देखील तब्बल बावीस गुन्हे दाखल होते पतीत पावन संघटनेचा पदाधिकारी म्हणून धर्म कार्य करतांना गुन्हे हे दाखल होतच असतात म्हणून धर्म कार्य सोडायचे नसते.जैन समाजाचा असल्याने तेंव्हा माझी अवेहलना झाली पण माझे कार्य मी सोडले नाही.पत्रकारांनी एखाद्या घटनेच्या किंवा प्रकरणाच्या दोन्ही बाजू परखडपणे मांडल्या पाहिजेत एकाबाजूने बातम्या प्रसिद्ध केल्यास प्रामाणिक आणि खरं समाज कार्य करणाऱ्या धर्मरक्षकास त्याचा त्रास होतो याचे भान प्रत्येक पत्रकरांनी ठेवलेच पाहिजे.
याप्रसंगी पत्रकारांशी सुसंवाद साधतांना राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग म्हणाले की,माझ्या प्रत्येक धर्म कार्यात आजपर्यंत पत्रकार बंधूंचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे पत्रकार समाज माध्यमाचा आरसा आहे.माझ्याबद्दल सध्या खूप खालच्या पातळीचे गलिच्छ राजकारण श्रीरामपूर शहरात चालू आहे.मला कोणत्या ना कोणत्या अप्रिय घटनेत गुंतवण्याचा कुटील डाव व माझ्यावर खोटे बिनबुडाचे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत कारण मला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पन्नास हजार मतांमुळे त्यांना जनता आता नाकारायला लागली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.पत्रकार बंधू माझ्या पाठीशी असल्याने मी अशा विरोधकांची कधीही फिकीर करणार नाही व माझे धर्म कार्य असेच अविरत चालू राहणार आहे.विरोधकांचे दुसऱ्यांच्या नावे चालणारे भ्रष्टाचारी कारनामे व धर्म विरोधी कामे आता एक एक बाहेर यायला लागले असल्याचेही बेग यांनी आपल्या भाषणात शेवटी म्हंटले आहे.
ज्येष्ठ पत्रकार रमन मुथा यांनी सागर बेग यांच्या पाठीशी सर्व पत्रकारांनी उभे राहण्याचे आवाहन करत बेग यांच्या धर्म कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दैनिक लोकमतचे रमेश कोठारी,पद्माकर शिंपी,बाळासाहेब भांड, विष्णु वाघ,सुरेश कांगुने,बाळासाहेब आगे,स्वप्नील सोनार, रूद्रा न्युजचे चोरमले , अमोल कांबळे, स्वामिराज कुलथे,रवी आसने,देविदास देसाई,जय सावंत,विशाल वर्धावे,माळवे यांच्यासह असंख्य मान्यवर पत्रकार उपस्थित होते सर्व पत्रकार बंधूंचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.