टाकळीभान दुचाकीस वाचवण्याच्या प्रयत्नात बोलोरो झाडावर धडकून भीषण अपघातात तीन ठार सहा जखमी

टाकळीभान दुचाकीस वाचवण्याच्या प्रयत्नात बोलोरो झाडावर धडकून भीषण अपघातात तीन ठार सहा जखमी
टाकळीभान प्रतिनिधी-नेवासा फाटा येथून विवाह सोहळा उरकून टाकळीभान कडे येत असताना ,वऱ्हाडाच्या बोलेरो गाडीला दुचाकी स्वर आडवाल्याने वाचवण्याच्या प्रयत्नात बोलोरो लिंबाच्या झाडाला आदळून ,झालेल्या भीषण अपघातात मोटरसायक चालक व बोलेरो गाडीतील दोन महिला ठार ,साहा जखमी जखमीला अहिल्यानगर व श्रीरामपूर साखर कामगार येथे उपचार चालू आहे,
विवाह समारंभ उरकुन घराकडे परत येत आसलेल्या बोलोरो जिपला दुचाकिस्वार आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बोलोरोवरील नियंञण सुटल्याने दुचाकिस्वाराला चिरडुन बोलोरो लिंबाच्या झाडाला आदळुन झालेल्या अपघातात दुचाकि स्वारासह तीन ठार झाले आहेत तर दोघांची प्रकृती अत्यावस्थ आसल्याने अहील्यानगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान श्रीरामपुर नेवासा राज्यमार्गावर टाकळीभान शिवारात घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, टाकळीभान येथील प्रगतशिल शेतकरी शिवाजीराव धुमाळ यांच्या मुलाचा विवाह प्रवरासंगम येथे आयोजित केला होता. विवाह सभारंभ आटोपुन घरी टाकळीभान येथे परतत आसताना टाकळीभान श्रीरामपुर राज्यामार्गार टाकळीभान शिवारातील स्वस्तीक ट्रेंड्रिंग या दुकानासमोर दिगंबर पांडूरंग शिंदे ( वय ६५ वर्ष ) राहाणार गुजरवाडी हे टीव्हीएस मोपेड नं एम एच १७ डी बी ९७०७ वरून जात असतांना प्रवरा संगम येथील विवाह आटोपून बोलेरो नंबर एम एच १७ क्यू १७९५ मधून टाकळीभान येथे येत असतांना
टीव्हीएस मोपेड स्वार हे अचानक गाडी समोर आल्याने त्यांना वाचवितांना चालकाचे वहानवरील नियंञण सुटल्याने बोलेरो बाजुच्या लिंबाच्या झाडाला घासल्याने बोलोरो जीपचा पञा उचकटुन अपघात घडला. त्यामुळे बोलेरो गाडीत बसलेल्या धुमाळ यांच्या नातेवाईकांना जबर ईजा झाली. या आपृघातात बोलेरो जीपचा चक्काचुर झाला आहे तर मोपेडचेही मोठे नुकसान झाले आहे. बोलेरोमध्ये एकुण आठजण प्रवास करीत होते. वर्दळीच्या ठिकाणी हा आपघात झाल्याने तरुणांनी त्वरीत मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेवुन जखमींना बोलेरो जीप मधुन बाहेर काढले व तातडीने श्रीरामपुर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान मोपेड स्वार दिगंबर शिंदे यांचा मृत्यू झाला
तसेच बोलेरो मधील सातारा येथील नातेवाईक देवयानी कुंडलिकराव जाधवराव (वय ६५) व गोपिका दिलीपराव जाधवराव (वय ५०) रा.भोईन ता. वाई जि. सातारा या दोन महिलांचा उपचारा सुरू असतांना मृत्यू झाला तर इतर सुप्रिया धुमाळ, प्रकाश धुमाळ, जनार्दन जाधवराव, सुशील इंगळे, दिलीप जाधवराव, उज्वला इंगळे आदी अपघातात जखमी झाले असून दोन गंभीर जखमींना अहिल्यानगर येथे हलवण्यात आले असून उर्वरित चार जणांना साखर कामगार रुग्णालय श्रीरामपूर येथे उपचार सुरू आहेत.
आपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलिस उप निरीक्षक मुरकुटे ,हे. कॉ. रवींद्र पवार, पो.ना.संतोष कराळे,पोलिसमित्र बाबा सय्यद हे घटनास्थळी पोहचले व अपघाताची माहिती घेतली.