सरसकट अतिक्रमण काढण्यासाठी टाकळीभान येथे उपोषण सुरु
सरसकट अतिक्रमण काढण्यासाठी टाकळीभान येथे उपोषण सुरु.
टाकळीभान-: प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील संविधान ग्रुपच्या वतीने गट नंबर 250/1 मधील अतिक्रमण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत निकासित करणे तसेच बस स्थानकाची जागा महापुरुषाच्या पुतळ्यासाठी मिळावी या मागणीसाठी सोमवार दि 7 ऑक्टोबर 2024 रोजी तलाठी कार्यालय टाकळीभान येथे उपोषण सुरू केले आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की टाकळीभान येथील गट नंबर 250/ 1 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे व कित्येक नागरिकांनी हे अतिक्रम हटवणे करता अमरण उपोषण देखील केलेले आहे त्यांना न्याय मिळाला नसून प्रशासन या कामी अपयशी ठरले आहे.
गावातील राजकीय पुढारी यांनी अतिक्रमणधारकांना गेल्या कित्येक वर्षापासून अभय दिलेले आहे व त्याबद्दल त्यांच्याकडून मोबदल घेतला आहे परंतु आतापर्यंत त्याची कुठल्याही प्रकारचे आतेमान ठेवण्याची प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही, सध्या अतिक्रमण निकसित करण्यासाठी ठराविक लोकांनाच नोटीसा बजावण्यात आल्या असून हा न्याय नसून अन्याय आहे. या अतिक्रमणाबाबत प्रशासन कोणाच्या दबाव खाली काम करते की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
शासनाने गट क्रमांक 250 एक मधील ठराविक अतिक्रमण हटवता प्रशासनाने संपूर्ण गट गाव कारभार यांना विकास कामासाठी रिकामा करून देण्याबाबत तसेच दिलेल्या नोटिस मध्ये संदर्भ क्रमांक 1 व 2 प्रमाणे आपल्याकडे अर्ज प्राप्त झाले ते गावातील सूडबुद्धीचे राजकारण आहे व गावातील ठराविक ग्रा.सदस्य आकसा पोटी आपल्याकडे अर्ज सादर केले आहेत.
तसेच टाकळीभान येथील बस स्टँड ची रिकामी जागा ही निकामी असून ती महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी देण्यात यावी व अतिक्रमणाबाबत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अतिक्रमण काढावे व सर्वांना समान न्याय देण्यात यावा अशी मागणी संविधान ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी ,तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहे. या निवेदनावर सुंदर रणनवरे, संदीप शिंगारे, विजय मैड, शंकर रणनवरे ,मनोज पवार किरण रणनवरे, आप्पासाहेब रणनवरे, संकेत गायकवाड, राजेंद्र रणनवरे,प्रकाश रणनवरे, मधुकर रणनवरे, शामराव खरात आदींची यांची नावे असून साह्या आहेत.