कृषीवार्तानोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र
गाळप न झालेल्या ऊस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये अनुदान मिळवा अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे- भाऊसाहेब पवार
गाळप न झालेल्या ऊस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये अनुदान मिळवा अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे- भाऊसाहेब पवार
–मुख्यमंत्री साहेब ऊस गाळप नझालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडून ,नुकसान भरपाई म्हणून 50 हजाराचे अनुदान मिळावा अशी मागणी युवक नेते भाऊसाहेब नानासाहेब पवार ,यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केले आहे,
हवालदिल झालाय कारण ऊस शेतकरी उसासाठी ऊस लागण करताना बेणे विकत घेण्यासाठी किंवा करण्यासाठी किंवा शेताची मशागत करण्यासाठी काही लोकांनी मागील शिल्लक जमापुंजी किंवा नवीन सावकाराकडून कर्ज घेऊन किंवा बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून किंवा बागायतदार सोसायटीकडून सोसायटीचे कर्ज घेऊन उसाच्या लागवडी केल्या सन 21 22 या वर्षामध्ये कारखाना चालू झाला आणि शेतकऱ्यांना वाटलं आता आपले कर्ज भेटतील म्हणून शेतकऱ्यांनीकर्ज काढून म्हणा किंवा कोणत्याही स्वरूपात काही खते टाकलीआणि चांगल्या प्रकारे ऊस आणलाआणि आता शेतकऱ्याला वाटले माझ्या मुलीचे लग्न होईल माझ्या वरील जुने कर्ज मीटेल मी घर बांधील मी शाळेची फी भरील असे कित्येक स्वप्न यावर शेतकऱ्यांनी पाहिले पण या. कारखानदारांनी त्याची सर्व स्वप्ने धुळीस मिळवली ऊस बारा महिन्याचा झाला नंतर 13 महिन्याचा झाला 14 महिन्याचा झाला वाळून गेला थोडक्या झाल्या पण या कारखानदारांना कीव आली नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा हिरवागार ऊस हा खोडक्या होऊन गेला वाळून गेला .जर योग्य वेळी ऊस तोडला असता तर 50 टन काहीना 60 टन काहींना 70 टन असे अवरेज मिळाले असते भावांनो पण या कारखानदाराने शेतकरी कायम कर्जाच्या बोजाखाली राहिला पाहिजे.या हेतूने त्यांचा ऊस वावरातच वाळवला काय करील शेतकरी हवालदिल झाला आणि शेवटी ऊस एकरी दहा पंधरा टनाने गेला आणि आता प्रश्न पडला पुढील पिके कशी उभी करायची मे महिना आलाय जून आला पाऊस पडेल काय करावं पण लहान लहान घरातील मुले डोळ्यासमोर येत होती की आता त्यांची शाळा चालू झाली आहे शाळेची फी भरायची आहे बि भरण करायचय ,वावर नीट करायचं ,आता तर पूर्ण कर्ज घेऊन बसलोय सोसायटी कर्ज देणार नाही ,घरातलं सोनू मोडलं आणि उसाला ढोस टाकले,खाजगी सावकारी कर्ज देणार नाही,त्याच्याकडे माझी काळीमाय वावर गहाण पडलंय,पाहुणा रावळ यांकडून हाता पाया पडून या उसासाठी दोन दोन पैसे गोळा केले माय बाप,आणि सभासदाचा कारखाना म्हणणाऱ्या या धन दांडग्यानि कारखान्याच्या प्रशासनाने शेतकरी माय बाप पुरा ची पुरा भूतो ना भविष्य प्रपंच सुपडा साफ करुन टाकला हो,आणि शेतकऱ्यांसाठी कोण बोलणार कुणासाठी बोलणार कारण ज्याच्या त्याच्या राजकीय पोळी भाजण्याचे पर्यंत कारखान्याचे इलेक्शनला करा हो या ला मतदान करा हो त्याला मतदान म्हणणाऱ्यांनी नंतर का ऊस नेण्यासाठी त्यांनी लोकांना प्रेशरआईज केले नाही सांगितले नाही की न्याया शेतकऱ्यांचा ऊस ,आपल्या अशोक सहकारी साखर कारखान्याने बाहेरून नऊ 10 महिन्याचे कवळे ऊस आनले आणि त्याचं गाळप केलं,आणि सभासद कारखान्याचे जे ऊस तोडून येऊन गाळप करणे गरजेचे होतं पन सभासदाचे ऊस वाळून खोडक्या करून ,त्यांना आत्महत्या करण्यासाठी मोकळे सोडून दिले आता त्यांच्या पुढे प्रश्न आहे यापुढे शेती उभी करायची कशी आणि जगायचं कसं त्यात हे तीन चाकी बिघाडी सरकार,ज्यांना शेतकऱ्याचं किंवा सामान्य जनतेचे कधीही घेणं नव्हतं,आणि कधीही राहणार नाही,त्यांनी लक्ष दिले नाही डोळ्यात दिसत असतानाही तसे दिसत नाही असे आंधळ्याची रूप धरणारे हे सरकार फक्त आपले भ्रष्ट कार्यकर्ते कारखानदार कार्यकर्ते कसे मोठे होतील या हेतूने दोनशे रुपये अनुदान कारखान्यासाठी दिले तोटा कारखान्याचा झाला होता की शेतकऱ्यांचा ,हेसुद्धा या शेतकरी म्हणवणार्या सरकारला कधीही कळाले नाही तेव्हा आता जर लक्ष दिले नाही तर हा शेतकरीही टिकणार नाही तेव्हा मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान स्वरुपात द्यावे आणि कारखान्याकडून ही वसूल करावी कारण चौकशीअंती सत्य बाहेर होईल की फक्त स्वतःच्या तिजोरी भरण्यासाठी बाहेरील कवळ्या उसआनुन शेतकरी सभासदांच्या उसाचे वाटोळे केले यापुढे या सरकारच्या आणि या कारखानदारांच्या भुला थापांना बळी न पडता,योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन उसाची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण,कधीही आपल्या सभासदांच्या हिताचं राहील माय-बाप शेतकऱ्यांनाेआता तरी जागे व्हा ,कोण आपल्या हिताचं आणि कोण नाही हे पहा फक्त पाहुणा रावळा कोण जातीचा कोण परत जातीचा मतदान टाकाल तर आपले भविष्याची जी पिढी आहे ते आपल्याला कधीही माफ करणार नाही ,
Rate this post