ग्रामीण भागात उपवर मुलाचे लग्न होतात,, पण आठ ते दहा दिवसात नवरी भुर,?
ग्रामीण भागात उपवर मुलाचे लग्न होतात,, पण आठ ते दहा दिवसात नवरी भुर,?
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात अनेक तरुणांनी तिशी पार केली परंतु मुलगी मिळणे अवघड होऊन बसले आहे त्यातच शहरी भागासह ग्रामीण भागातही मुलींच्या संख्या प्रमाणात घट झाली असून मुलांच्या वडिलांना वधू शोधण्यासाठी भटकंती करावी लागते भटकंती करूनही योग्य असे स्थळ मिळत नसल्याने त्यांची त्रेधातिरपीट होऊन बसली त्यातच एजंट लोक हाताशी धरून त्यांना भरपूर प्रमाणात गुपचूप काही रक्कम देण्यात येते एजंट लोक कोसोदूर आशा ठिकाणाहून वधु शोधून आणतो अवघ्या काही पब्लिक मध्ये लग्न लावतात वराकडील मंडळी खुश होऊन डामा डौलात राहतात आणि वधु हि दहा-बारा दिवस नवऱ्याशी आणि घरच्यांशी अगदी प्रेमाने राहते माहेरची आठवण येते म्हणून सासरकडील मंडळींना सांगते आणि भुरर होऊन जाते पुन्हा परत येण्याचे नावही घेत नाही. किंबहुना त्यांच्याकडील फोनही लागत नाही त्यावेळेस समजते की आपली फसवणूक झालेली आहे. असे अनेक उदाहरणे दृष्टीस पडत आहे इज्जतीचा पंचनामा होऊ नये म्हणून वराकडील मंडळी गुपचूप सहन करीत असल्याचे दिसून येत आहे ?
अशा अनेकांना लुबाडणाऱ्या एजंटना पाठीशी कोण घालत आहे की त्यांना आतून कोणी मदत करत आहे हेही कळेनासे झाले प्रशासनाने त्यांना पाय बंदी घालावी अशी ग्रामीण भागातील जनतेतून मागणी होत आहे