राजकिय

केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने इंधनावरील टॅक्स कमी करावा – ज्ञानदेव लष्कर

केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने इंधनावरील टॅक्स कमी करावा – ज्ञानदेव लष्कर

कर्जत प्रतिनिधी – केंद्र सरकार प्रमाणेच राज्यातील आघाडी सरकारने डिझेल आणि पेट्रोल वरील टॅक्स कमी करून जनतेला इंधन कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कर्जत तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर यांनी निवेदनाद्वारे कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून डिझेल व पेट्रोलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे होरपळून निघाले आहेत. आणि इंधनाच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. आणि याचाच विचार करून केंद्र सरकारने मागील चार दिवसापूर्वी पेट्रोल आणि डिझेल वरील अबकारी करात कपात करून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारने केले आहे. परंतु राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी डिझेल व पेट्रोलच्या दरात कुठलीही कपात केलेली नसल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.
असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर प्रतिलिटर १९ रुपये इतका जीएसटी कर लावत आहेत. तर आपले महाराष्ट्र सरकार प्रतिलिटर २९ रुपये टॅक्स लावत आहे. असे या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने सुद्धा टॅक्स कमी करून जनतेला दिलासा देण्याचे काम करावे. त्यामुळे जनतेचा काही प्रमाणात महागाईपासून सुटका मिळण्यास मदत होईल असेही म्हटले आहे. या निवेदनावर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर भाजपाचे नेते अशोक खेडकर, आरती थोरात, उमेश जपे, भाजपाचे कर्ज शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, अंबादास गुंजाळ, धनंजय आगम, राजेंद्र थोरात, प्रशांत शिंदे, बबन लाडाने, धनंजय चांगण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे