जबाबदार लोकप्रतिनिधी कंत्राटदार ,प्रशासकीय आधिका-यांच्या धोरणाच्या निषेधार्थ “यमराज स्वागत समारोह आंदोलन*:-
*बीड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाढत्या अपघातास जबाबदार लोकप्रतिनिधी कंत्राटदार ,प्रशासकीय आधिका-यांच्या धोरणाच्या निषेधार्थ “यमराज स्वागत समारोह आंदोलन*:-
*डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*
*बीड शहरातुन जाणारे राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर,बीड अहमदनगर*
*तसेच अहमदपुर
अहमनगर
पैठण पंढरपूर आदि मार्गाचे काम रखडलेले असुन अंदाजपत्रकाला फाटा देऊन*
*धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वगळता बहुतांश रस्ते दुपदरी,संरक्षक कठडे आणि दुभाजक नसलेले असुन अर्धवट कामे होऊन रखडलेलीच आहेत.अपघातांची वाढती संख्या व लोकप्रतिनिधींकडून केवळ श्रेयवादाची लढाई मात्र कामाच्या दर्जाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष प्रशासकीय आधिका-यांची कंत्राटदारा सोबत भागीदारी व त्याला लोकप्रतिनिधींकडून छुपा पाठींबा यामुळे बीड जिल्ह्य़ातील रस्ते यमसदनी जाणारे असुन याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक बीड शहरात यमराच्या वेशभुषेत यमराजाचे छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय “यमराज स्वागत समारोह आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस, सय्यद आबेद,बलभीम उबाळे, राहुल कवठेकर ,मुश्ताक शेख,दिपक बांगर,अजय सरवदे , मायकल वाघमारे,मिलिंद सरपते, संभाजी सुर्वे,नामदेव म्हेत्रे,दिपक खेडकर आदि सहभागी झाले होते. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले*.
*छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक याठिकाणी उड्डाणपूल ची आवश्यकता*
*बीड जिल्ह्य़ात उड्डाणपूलाचे जाळे जरी विणण्यात आले असले तरी बीड शहरालगत असणारे दोन चौक छत्रपती संभाजी महाराज चौक आणि महालक्ष्मी चौक याठिकाणी शहरातुन बाहेर तसेच बाहेरून शहरात व बायपास मार्गाने येणा-या हजारो वाहनांची क्राॅसिग होत असून त्याठिकाणी अपघातात बळी जाण्याचे प्रमाण वाढले असुन त्याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता आहे. त्याचवेळी ईतर ठिकाणी आवश्यकता नसताना उड्डाणपूलासाठी कोट्यावधी रूपयांचा अवाजवी खर्च केलेला दिसत आहे*.
*लोकप्रतिनिधींची श्रेयवादाची लढाई मात्र कामाच्या दर्जाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष*
*हजारो कोटी रूपयांचा निधी असलेले रस्ते कामाच्या मंजूरीवरून विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून आम्हीच रस्ते आणले म्हणून प्रसिद्धी माध्यमातून वल्गना करणा-या लोकप्रतिनिधींकडून कामाच्या दर्जाबाबत तसेच वेळेत काम पूर्ण करून घेण्याबाबत मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असून सामान्य लोकांमध्ये याबद्दल तिव्र नाराजी दिसुन येत आहे*.