‘मुळा’ ने घेतली गुरुवारी (दि. 20 जानेवारी) जिल्ह्यात ऊस गाळपात आघाडी. एक दिवसात केले 9 हजार 800 मे. टनाचे उच्चांकी गाळप.
‘मुळा’ ने घेतली गुरुवारी (दि. 20 जानेवारी) जिल्ह्यात ऊस गाळपात आघाडी.
एक दिवसात केले 9 हजार 800 मे. टनाचे उच्चांकी गाळप.
सोनई,मुळा सहकारी साखर कारखान्याने 2021-22 ऊस गळीत हंगामात 15 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून आत्तापर्यंत 5 लाख 78 हजार 780 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 4 लाख 76 हजार 850 साखर पोत्यांची निर्मिती केलेली आहे. सरासरी साखर उतारा 10.09 असून कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादकांच्या नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप कारखाना करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी दिली. चालू हंगामात गुरुवार, दि. 20 जानेवारी, 2021 रोजी जिल्ह्यात ऊस गाळपात कारखान्याने आघाडी घेतली असून एका दिवसात 9 हजार 800 मेट्रिक टन ऊस गाळप करून नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे.
कारखान्याचे चिफ इंजिनीयर, चिफ केमिस्ट, शेतकी अधिकारी व सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे व समन्वयातून हा उच्चांक प्रस्थापीत करणे शक्य झाले असल्याची माहिती कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी दिली.
यावर्षी कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्प व डिस्टीलरी प्रकल्पही व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने चालू असून इथेनॉल प्रकल्पाचे काम पुर्ण झालेले असुन त्याच्या ट्रायलही पुर्ण झालेल्या आहेत सर्व सोपस्कर पार पडल्यानंतर फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष इथेनॉल निर्मिती सुरू होणार असल्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी सांगितले.
ऊस गाळपात जिल्ह्यात मुळा कारखान्याने गुरुवारी आघाडी घेतल्यामुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. विक्रमी गाळपाबद्दल कारखान्याचे संस्थापक जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख पाटील, नामदार शंकररावजी गडाख पाटील, कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाईस चेअरमन कडुबाळ कर्डिले (नाना) व सर्व संचालकांनी कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी मोहन
शेगर, सोनई