गेवराई येथे धनलक्ष्मी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
गेवराई येथे धनलक्ष्मी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
वित्तीय संस्थांनी विचारपूर्वक काम केल्यास प्रगती शक्य – ह.भ.प.घोगे महाराज
सध्या वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संस्थेच्या माध्यमातून व्यापारी तसेच नव उद्योजकांना कमी वेळेत कर्ज उपलब्ध होत असून सुशिक्षित तरुणांना देखील रोजगार निर्माण झाले आहे. तसेच या संस्थांकडे ठेव ठेवणारांची संख्या खुप आहे, तशी कर्ज मागणारांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे या संस्थांपुढे योग्य कर्जदार शोधणे आव्हान ठरत आहे. तरी या वित्तीय संस्थांनी विचारपूर्वक काम करुन योग्य कर्जदारांना कर्ज वितरीत केल्यास संस्थेची निश्चितच प्रगती होते असे प्रतिपादन चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती मसाननाथ महाराज घोगे यांनी केले.
गेवराई येथे धनलक्ष्मी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय शाखेचे उद्घाटन चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत मसाननाथ महाराज घोगे यांच्या हस्ते सोमवारी उत्साहात संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. पुढे घोगे महाराज म्हणाले की, ग्रामीण भागातून सुरु झालेली धनलक्ष्मी पतसंस्था शहरात सुरु होतेय हि आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागात या संस्थेचे ज्याप्रमाणे उल्लेखनीय कार्य केले आहे, त्याचप्रमाणे शहरात देखील करुन या पतसंस्थेची यशस्वी वाटचाल शहरात देखील बहरत जावो अशा शुभेच्छांसह आशिर्वाद शेवटी घोगे महाराज यांनी दिले. या पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित, दैठणचे सरपंच प्रतापसिंह पंडित, सीए रविंद्र गिरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, साईराम मल्टीस्टेटचे संस्थापक शाहीनाथ परभणे, शाहू अर्बनचे संस्थापक हनुमान गात, भाजपचे नेते अरुणनाना मस्के, डिजिटल मिडीयाचे बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाट, एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष इंदे, गोदावरी मल्टीस्टेटचे संस्थापक प्रभाकर पराड, आईसाहेब अर्बनचे चेअरमन चंद्रकांत राऊत, सह्याद्री अर्बनचे चेअरमन प्रा.बाबु वादे, सहयोग मल्टीस्टेटचे संस्थापक डिगांबर टेकाळे, जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन शिवराम मस्के, शिवसेना शिंदे गटाचे गेवराई तालुकाध्यक्ष शिनुभाऊ बेदरे, काँग्रेसचे गेवराई तालुकाध्यक्ष महेश बेदरे, सरपंच ज्ञानेश्वर नवले, ज्योतीक्रांती अर्बनचे संस्थापक प्रा.संजय तळतकर, नवक्रांती निधीचे चेअरमन कृष्णा शहाणे, खंडेश्वर पतसंस्थेचे सचिव महेश चेके, रुद्रेश्वर अर्बनचे चेअरमन जाधव, शिवकेशर अर्बनचे चेअरमन रावसाहेब बेदरे, विजय डरपे, गणेश गवते सर, विनोद खराद, रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष धम्मपाल कांडेकर, किराणा असोसिएशनचे रवींद्र रुकर, लक्ष्मण चव्हाण, प्रभाकर भालशंकर, गेवराई येथील पत्रकार मधुकर तौर, दिनकर शिंदे, आंकुश आतकरे, सुभाष सुतार, आय्युब बागवान, बापु गाडेकर, भागवत जाधव, राजेंद्र बरकसे, विनोद पौळ, बापुसाहेब हुंबरे, अमोल कापसे, वैजिनाथ जाधव, रविंद्र घाडगे, अमोल वैद्य, तुकाराम धस, प्रदिप जोशी, तुळशीराम वाघमारे, अल्ताफ कुरेशी, रफीकभाई शेख, आर.आर.आबा बहिर आदींसह विविध राजकीय पक्ष-संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मल्टीस्टेट, पतसंस्था, निधीचे चेअरमन, संचालक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, खातेदार, नागरिक, पत्रकार बांधव आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर उपस्थितांचे स्वागत पतसंस्थेचे चेअरमन विनोद नरसाळे, अभिमान शेंबडे, सुधाकर लोंढे, मच्छिंद्र तकीक, नारायण रेडे, शिवाजी काचोळे, किरण लोंढे, भगवान गवते, सलिम शेख यांनी केले. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन पत्रकार सुनील मुंडे व विनोद पौळ यांनी केले.