स्मशानभुमी गटामध्ये अफरातफर करुन गटातुन भिल्ल स्मशानभूमी नावाचा पुरावा नाहिसा
स्मशानभुमी गटामध्ये अफरातफर करुन गटातुन भिल्ल स्मशानभूमी नावाचा पुरावा नाहिसा
गेल्या सहा वर्षापासुन आदिवासी समाजाच्या स्मशानभुमीसाठी संघर्ष करुनही प्रशासनातील अधिकारी धनदांडग्या लोकांना पाठीशी घालुन उतार्यावर भिल्ल स्मशानभुमी गटामध्ये अफरातफर करुन गटातुन भिल्ल स्मशानभूमी नावाचा पुरावा नाहिसा करणाऱ्या गटविकास अधिकारी,सर्कल, तलाठी, व गामसेवक यांचेवर कार्यवाही करावी असे प्रतिपादन एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी भोकर फाटा येथे रास्ता रोको प्रसंगी केले.
पुढे ढवळे म्हणाले की कायदा हा धनदांडग्यांकडे वळाल्यामुळेच उतार्यावरील भिल्लस्मशानभुमीची नोद गायब झाल्याचे सांगत अदिवासी समाजाला जिवंतपणे घर नाही आणी मेल्यानंतरही स्मशानभुमीसाठी आंदोलन ही शरमेची बाब असुन प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे राञी अपराञी प्रेताची अवहेलना होते तरी गट नं.४० मधील आदिवासी स्मशानभुमीवरील धनदांडग्यांचे अतीक्रमण काढुन भिल्ल समाज्याच्या ताब्यात द्यावी तसेच भोकरमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या १५०० असुन गरीब कुंटुंबानी यावेळी काय करावे असा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रशासनाला निवेदन घ्यायलासुध्दा संपाचे कारण सांगुण वेळ मारुन नेत आहे परंतु यापुढे आंदोलन नाही पण भिल्ल समाजाचा मानुस दगावला तर ग्रामपंचायत कार्यालयास कंपाउंड करुन स्मशानभुमी म्हणुन वापर करा.व लाचखोर अधिकाऱ्यांना धडा शिकवा असे अवाहन शिवाजी ढवळे यांनी केले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष शिवाजी ढवळे, जि,उपा राजेंद्र भालेराव, जि.संघटक लक्ष्मण साठे, ता अध्यक्ष सुभाष मोरे,लहाणू मोरे,बबन आहेर,सर्जेराव आहेर, राजु लोखंडे,सुरेश आहेर,दत्तू इंगळे, महिला ता अध्यक्ष सुनिता आहेर गिताबाई आहेर, भास्कर आहेर , प्रकाश आहेर,
प्रल्हाद बर्डे, आदि बांधव यावेळी उपस्थीत होते,
यावेळी तालुका ग्रामिण पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक दशरथ चौधरी, पो.उपनिरीक्षक अतुल बोरसे, पो उपनिरीक्षक निकम, स.फौ गायमुखे,स.फौ,हबीब शेख,पोहेकाँ रविंद्र पवार,पोहेकाँ अयुब शेख,पोना अशोक पवार,पोना शेंगाळ पोकाँ घोरपडे,पोकाँ गोरे,पोकाँ वंदना पवार,सहाय्यक बाबा सय्यद, पो.पा.बाबासाहेब साळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.