सोनई बंदला संमिश्र प्रतिसाद हिंदु संघटनेच्या वतीने सोनई पोलीसाना निवेदन.

सोनई बंदला संमिश्र प्रतिसाद हिंदु संघटनेच्या वतीने सोनई पोलीसाना निवेदन.
शेवगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर टाकण्यात आलेला असुन त्यात अखंड हिंदूस्थानचे आरध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जिहादी औरंगजेबाशी तुलना केली असुन त्याचे मुख्य सुत्रधार शोधुन तत्काळ अटक करुण त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच असा प्रकार परत कोणीही करू नये याच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे.
सदर प्रकरणामुळे हिंदुच्या भावना दुखावलेल्या असुन कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कट वेळोवेळी करण्यात येते असुन त्याच्यावर कडक कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे
तरी प्रशाशनाने त्या जिहादींवर कठोरात कठोर कार्यवाही करावी.या साठी सोनई येथील सकल हिंदू समाज तरुण मंडळ व सोनई ग्रामस्थ यांच्या वतीने सोनई शहरातून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उभी पेठ मार्गे हलवाई गल्ली,शनी चौक ते सोनई पोलिस स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय घोषणा देत शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले. यावेळी भगवान सानप संदिप कुसळकर,संदिप लांडे,यांनी निषेध व्यक्त केला.शनी शिंगणापूर पोलिस स्टेशन चे अधिकारी रामचंद्र कर्पे साहेब यांना निवेदन देण्यात आले. समवेत
सामाजिक कार्यकर्ता संदिप अशोकराव कुसळकर,अनिल भैय्या निमसे संदिप लांडे,महेश दरंदले,विशाल भळगट,भगवान सानप,अनिल कोल्हे, सरपंच धनंजय वाघ,सुनील तागड, अक्षय म्हसे,गणेश चव्हाण,ऋषी जंगम, स्वप्निल बळगट सुहास भळगट,बापूसाहेब दरंदले,सुधीर दरंदले,विशाल वने,व सोनई सकल हिंदू समाज व व्यापारी असोसिएशन उपस्थित होते.