रविवारी अहमदनगर येथे जिल्हा लोहार कारागिरांचा मेळावा व गुणवंतांचा गौरव
रविवारी अहमदनगर येथे जिल्हा लोहार कारागिरांचा मेळावा व गुणवंतांचा गौरव
टाकळीभान प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा विश्वकर्मा विचारमंच (लोहार समाज) व नाशिक विभागीय लोहार शिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील फेब्रुवारी, मार्च २०२३ मध्ये १० वी, १२ वी, पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व अहमदनगर जिल्ह्यातील लोहार कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना व इत्तर योजनांचे मार्गदर्शन करण्यासाठी रविवार (२४ सप्टेंबर) सीएसआरडी महाविद्यालयात सकाळी १० ते २ यावेळेत कारागीर मेळावा आयोजित केलेला आहे.
या मेळाव्यात खादीग्रामोद्योग कार्यालयाचे अधिकारी बाळासाहेब मुंढे हे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, राज्य व केंद्रशासनाच्या योजना यावर, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे हे सुशिक्षित बेरोजगार व कारागिरांसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना यावर, महसूल अधिकारी राजेंद्र लाड हे शासनाच्या विविध योजनांची माहिती, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे हे गरीब, वंचित, निराधार व होतकरू विध्यार्थ्यांसाठी लोहार शिक्षण परिषदेचे कार्य यावर, तर समाजसेवक हर्षल आगळे हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा महाज्योतीच्या योजना यावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी हर्षल आगळे (९८२२३३५५९२), राजेंद्र लाड, अनिल हिवाळे, प्रा.सुभाष कौसे, विनायक गाडेकर, ज्ञानेश्वर वैद्य, गुरूप्रसाद लोहार, विवेक नन्नवरे यांच्याशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे याचे मार्गदर्शन मेळाव्याच्या ठिकाणी केले जाईल. सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास कारागिरांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले जाईल. मेळाव्याला येणाऱ्यांनी आधार कार्ड, मतदान कार्ड, जातीचा दाखला, (प्रांत अधिकारी यांनी दिलेला), उत्पन्नाचा दाखला,(तहसिलदार यांनी दिलेला), वय,राष्ट्रीयत्व व डोमिसाईल दाखला, बँक शिल्लक प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचा फोटो, रेशनकार्ड ही कागदपत्रे आणावीत. मोठ्या संख्येने लोहार बांधव उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले,