राहुरी विधानसभेसाठी उच्चशिक्षित तरुण संदीप चोरमले यांचा उद्या उमेदवारी अर्ज होणार दाखल.
राहुरी विधानसभेसाठी उच्चशिक्षित तरुण संदीप चोरमले यांचा उद्या उमेदवारी अर्ज होणार दाखल.
राहुरी विधानसभेसाठी उच्चशिक्षित तरुण संदीप चोरमले हे लोक संघर्ष पक्षाकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे स्वतः इंजीनियरिंग करून पुढील शिक्षण घेत असलेले सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत धडपड करणारे युवा नेतृत्व आहे राहुरी श्रीरामपूर नेवासा अहिल्यानगर येथील तरुण पुणे येथे नोकरी निमित्त राहतात त्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न ध्यानात घेऊन आपल्या भागात नोकरी कशा उपलब्ध होतील उद्योग व्यवसाय जास्त प्रमाणात आणण्यासाठी आत्तापर्यंतचे राजकारणी अपयशी ठरल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे मूलभूत प्रश्न याकडे दिग्गज राजकारणाचे लक्ष नसून पुढील दिशा वेगळी ठरणार आहे. तसेच राजकारण हे फक्त मोठ्या पुढाऱ्यांनी करावे व जनतेने त्यांच्या पाठीमागे राहावे पाच वर्ष त्यांच्या पाठीमागे राहून फक्त आश्वासनांना बळी पडावे तरुण हे बेरोजगार होत चालल. त्यांच्यासाठी मी उमेदवारी करत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांची हीच धडपड पाहून लोक संघर्ष पक्षाचे Advयोगेश माखने यांनी संदीप चोरमले या उच्चशिक्षित तरुणाला राहुरी मधून संधी दिल्याने हे उद्या 28 10 2024 रोजी राहुरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करणारा असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे