ब्रेकिंग

विज बिल थकल्याने मिरी तिसगाव नळयोजनेतील 24 गावांचा पाणीपुरवठा बंद,,

विज बिल थकल्याने मिरी तिसगाव नळयोजनेतील 24 गावांचा पाणीपुरवठा बंद,,

 

पाथर्डी व नगर तालुक्यातील 32 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजना या योजनेचा महावितरणे थकबाकीचे कारण पुढे करत वीज पुरवठा बंद केल्याने गेल्या आठ दिवसापासून लाभधारक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा बंद केल्याने या गावांमध्ये पाण्याचा ठणठणाट झाला आहे. पाथर्डी व नगर तालुक्यातील सुमारे 32 गावे या प्रादेशिक नळ योजने अंतर्गत येतात या गावांना मुळा धरणावरून पांढरीचापूल पर्यंत स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो पांढरीचापूल येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधून पाथर्डी व नगर तालुक्यातील लाभधारक गावांना पाण्याचे वितरण केले जाते. उन्हाची तीव्रता लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी गावागावातून वाढत आहे असे असतानाच 7 मे रोजी महावितरणने थकबाकी वाढल्याचे कारण पुढे करत या योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याने गेल्या आठ दिवसापासून 24 गावांना सुरू असलेला पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे अनेक गावातील सरपंचांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी साडेतीन लाख रुपये महावितरणकडे थकबाकीपोटी भरण्यात आले होते त्यानंतर पुन्हा एकदा महावितरणने पंधरा दिवसातच थकबाकीचे कारण पुढे करत या योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे 24 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे उर्जा राज्यमंत्री आहेत त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष घालून हा प्रश्न केव्हा मार्गी लावणार याकडेच लाभधारक गावातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. पाणीटंचाईच्या काळातच महावितरणने वीज कनेक्शन बंद केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पैसे भरल्यानंतर वर्षभरात एकदाही कनेक्शन कट करत नव्हते परंतु दहा वर्षानंतर पहिल्यांदाच पैसे भरूनही पंधरा दिवसात पुन्हा वीज कनेक्शन कट करण्याचे काम महावितरणने केले आहे. महावितरवर कोणाचा धाक उरला नाही का असा सवाल युवानेते बंडू पाठक, संतोष शिंदे, सुरेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

 7 मे रोजी मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचा वीजपुरवठा बंद केला आहे त्यामुळे 24 गावांचा पाणी पुरवठा बंद झालेला आहे.नितीन काचोळे(पाणी वितरण कर्मचारी)

उर्जामंत्र्याच्या मतदार सघांत मिरी तिसगाव पाणी पुरवठा चे लाईट कनेकशन कट केल्याणे प्रचंड नाराजी
मंत्री असुन जर मतदार संघावर अशी वेळ येणार असेल तर आमदार असते तर आम्हाला काय लवकर न्याय मिळाला नसता आता असे वाटत ?
सामाजिक कार्यकर्ते
राजुमामा तागड

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे