तहसीलदारचा अनधिकृत गळ्याचे उद्घाटन न करण्याचा आदेश डावलून
तहसीलदारचा अनधिकृत गळ्याचे उद्घाटन न करण्याचा आदेश डावलून…
तहसीलदारचा अनधिकृत गळ्याचे उद्घाटन न करण्याचा आदेश डावलून जानेवारी रोजी सकाळी शोरूम उद्घाटन करण्याची महाले यांची तयारी प्रशासन व ग्रामस्थांनी आंदोलन कर्त्यांनी हाणून पाडला,व शोरूम बंद करण्यात आले ,
टाकळीभान ग्रामस्थांनी गुरुवार दिनांक 26 जानेवारी रोजी होणारे महाले ज्वेलर्स नावाने होणारे अनधिकृत गाळ्यातील उद्घाटन बंद पाडले. ही घटना गुरुवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयास मिळालेल्या तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे या शासकीय जागेवरील गाळ्याचे उद्घाटन त्वरित बंद करण्यात आले. याप्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी एकत्र येऊन या अनधिकृत झालेल्या या गाळ्यातील उद्घाटनास विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या गाळ्याचे 26 जानेवारी रोजी उद्घाटन होऊन कार्यक्रम पत्रिका व्हाट्सअप वर फिरत होती, त्यातच ज्या मान्यवर व पत्रकार बंधू यांची नावे टाकली त्यांनी न विचारता पत्रिकेत नावे टाकल्याचे सांगून या अनधिकृत बांधकामास पाठिंबा नसल्याचे खुलासा देऊन घोषित केले होते, त्याची उद्घाटनाच्या अगोदरच्या दिवशी गावात पूर्ण चर्चा होती. त्यामुळे उद्घाटनाचे काय होणार याची उलट सुलट चर्चा गावात होती तसेच या अनाधिकृत गाळ्या संदर्भात भाजपचे जिल्हा कार्यकर्ते नारायण काळे, यांनी गुंढण आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र उर्फ मल्हार रणनवरे यांनी उद्घाटन प्रसंगी आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन तहसीलदार व विविध शासकीय खात्यांना दिले होते. त्यानुसार नारायण काळे, व मल्हार रणनवरे यांनी उद्घाटन रद्द करण्याचा आदेश असूनही गाळा उघडल्याने सकाळी साडेदहाच्या दरम्यान आंदोलनास सुरुवात केली, या गाळ्या मध्ये निमंत्रक सचिन महाले , अमोल महाले यांनी दुकानाच्या उद्घाटनाच्या सुरक्षेसाठी लेडीज व जेंट्स बाऊन्सर उभे केल्याने, तसेच शासनाचा आदेश डावलून उद्घाटन होत असल्याने ग्रामस्थांचा पारा चढला, व ग्रामस्थ व दुकानाची कर्मचारी यांत खडा जंगी झाली. याप्रसंगी मंडळ अधिकारी ओहळ, कामगार तलाठी भडकवाल व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ढुमणे यांनी शासकीय स्तरावरून आलेल्या आदेशाची प्रत त्यांना देऊन गळ्याला चिटकून गाळा बंद करण्याचा आदेश दिला. यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, यांनी खुलासा केला की अनधिकृत बांधकामास आमचा पाठिंबा नसून न विचारता कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकल्याचे त्या म्हणल्या… याप्रसंगी ज्ञानदेव साळुंके, शिवाजीराव शिंदे, मयूर पटारे, सुनील बोडखे, गणेश पवार, भाऊसाहेब पटारे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, दत्तात्रय नाईक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त या अतिक्रमण गाळ्याची मोठी चर्चा गावात सुरू होती. व स्वातंत्र्यदिनी गावात वेगळेच चित्र लोकांना पाहायला मिळाले. यामुळे अनधिकृत बांधकामास चाप बसणार असून अनधिकृत बांधकाम न होऊ देण्याचा विडा ग्रामस्थांनी उचलला आहे असे यावरून निदर्शनास येत आहे.