तालुक्यात रमाई आवास घरकुल योजनेला निधीच नाही, लाभार्थी आर्थिक गर्तेत
तालुक्यात रमाई आवास घरकुल योजनेला निधीच नाही, लाभार्थी आर्थिक गर्तेत
राहुरी : तालुक्यात रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे सुरु आहेत मात्र नवीन वर्षात या योजनेला निधीच नसल्याने या योजनेतील घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात रेंगाळली आहेत
राहुरी तालुक्यात रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत
लाभार्थ्यांनी या घरकुलांची कामे उधार उसनवारी करत काही ठिकाणी अर्धवट तर काही गावात पूर्णत्वाकडे नेली आहेत यातून लाभार्थींना पहिले दुसरे टप्प्यातील अनुदान मिळाले तर काही लाभार्थींना अजून अनुदानच मिळालेले नाही ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर विचारणा केली असता नवीन वर्षात अनुदान आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते त्यामुळे लाभार्थ्यांपुढे मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे उधार उसनवारी करत घरकुलासाठी आणलेल्या चीजवस्तूचे पैसे द्यायचे कुठून तर उधारीने आणलेल्या दुकानदाराकडून तगादे वाढल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडला असल्याचे अनेकांनी सांगितले आहे
ग्रामीण भागात या योजनेसाठी तुटपुंजी रक्कम शासनाकडून दिली जाते त्यात आजच्या भरमसाठ महागाईने घर बांधणे जिकरीचे झाले आहे वरून भरिसभर अनुदानच नसल्याने कामे बंद करण्याची वेळ आली आहे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक राज असल्याने या गोरगरीब लाभार्थ्यांच्या व्यथा तिथपर्यंत पोहोचत नसल्याची खंत या लाभार्थी वर्गातून व्यक्त होत आहे