माझा भाऊ सोनू बेग स्वतःहून पोलिसात हजर.= राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर बेग. पोलिसांनी पूर्व वय मनस्य व गैरसमजुतीतून माझे नावाचा व परिस्थितीचा उपयोग करून घेतला= शाह.

माझा भाऊ सोनू बेग स्वतःहून पोलिसात हजर.= राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर बेग.
पूर्व वैमनस्य व गैरसमजुतीतून माझे नावाचा व परिस्थितीचा उपयोग करून घेतला= शाह.
दोन वर्षांपूर्वी न घडलेल्या घटनेची फिर्याद पूर्व वैमन्याशातून तसेच राजकीय सूड भावनेने सोनु बेग यांच्यावर कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे पोलीस म्हणतात बऱ्याच गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी पकडला परंतु मोका यासह आदि केसेस सूड भावनेने दाखल झाल्या होत्या त्यामध्ये निर्दोष असल्याने गुन्हा करेल नाही बळजबरी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांना मदत व्हावी म्हणून सोनू बेग हा स्वतः पोलीस स्टेशन येथे हजर झालेला आहे मात्र जाणीवपूर्वक न केलेले गुन्हे दाखविण्याचे काम पोलिसांवर काहीतरी दबा वापरतात की काय ? नेमकी हे कोण? गुन्हा घडेल नसल्याबाबत स्वतः फिर्यादीने कोर्टात तसे पोलिसांना लेखी देऊनही फरार गुन्हेगार पकडला म्हणून बदनामी करण्याचे षडयंत्र आहे. याबाबत न केलेल्या गुन्हा दाखवण्याचे काम काही पोलीस व विघ्नसंतोषी लोकांकडून केले जात आहे. तसेच काही विरोधी व समाजकंटक व धर्म विरोधी लोक पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे मत राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर बेग यांनी म्हटले आहे. सागर बेग यांनी दिलेल्या प्रसिद्धीत म्हटले आहे की दोन वर्षांपूर्वी गोंधवणी शिवारात राहणाऱ्या तनवीर शहा यांच्या पत्नीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की माझ्या पतीस सोनू बेग व त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली त्यानुसार पोलिसांनी फिर्याद नोंद करून घेतली परंतु न घडलेल्या घटनेमागील खरे गुपित माननीय न्यायालयासमोर फिर्यादीने लेखी जबाब देऊन उघड केले. फिर्यादीने म्हटले आहे की पोलिसांनी माझ्यावर दबाव टाकून पूर्व वैमनस्यातून माझे नावाचा व परिस्थितीचा गैर उपयोग करून मला खोटी फिर्याद द्यायला भाग पाडले आहे. मी दिलेली फिर्याद खोटी असून माझ्या पतीस मारहाण झालेली नाही. तरी पोलिसांनी कारवाई करत सोनू बेग व्यतिरिक्त इतर सहकाऱ्यांना माननीय न्यायालय येथे हजर केले त्यांना न घडलेल्या खोट्या प्रकरणात जामीन देखील मिळालेला आहे खोट्या कारवाईचा बडगाउगारला आहे सोनू बेग यांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन हजर झालेले आहे पोलिसांना सहकार्य केले जात आहे. घटना घडलेलीच नसताना दोन वर्षापासून फरार होण्याचा प्रश्नच येत नाही असे मत सागर बेग यांनी व्यक्त केले. सुड भावनेने कारवाई होत असेल तर त्याबाबत सविस्तर चौकशी होणे गरजेचे आहे व होणारच आणि सत्य जनतेसमोर येईल आमचा न्यायदेवतेवर विश्वास असल्याचेही यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांनी विश्वास व्यक्त केला.
माझ्या धर्मावर प्रेम करून त्याची संस्कृती जतन करणे हा माझा अधिकार व मी ते कर्तव्य मानतो त्यातच लव जिहाद पीडित परिवार व मुलींना न्याय मिळवून देण्यास अहोरात्र संघर्ष करत आहे बऱ्याचदा त्यांच्या तक्रारी देखील न घेतलेले आपल्याला पहावयास मिळाले आहे. गुंडांकडून त्यांना त्रास दिला जातो त्यात आम्ही आमची भूमिका घेतल्याने अनेकांची पोट दुखी होते. त्यामुळे अनेक मार्गाने आम्हाला बदनाम करण्याची अशा प्रवृत्तीच्या वापर केला जातात पण याची आम्हाला परवा नाही कारण जनता आमच्या सोबत आहे.राष्ट्रहित व धर्म सर्वपरी
राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय श्रीराम संघ सागर बेग.