आरोग्य व शिक्षण

प्रतिभाविष्कार’ “जल्लोष चिमुकल्यांचा” वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न..!!  

प्रतिभाविष्कार’ “जल्लोष चिमुकल्यांचा” वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न..!!

 

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल यांच्या वतीने बुधवार ता. ०५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता ‘प्रतिभाविष्कार’ “जल्लोष चिमुकल्यांचा” हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०२३ उत्साह पुर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

 

      या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खडांबे खुर्द गावचे प्रथम नागरिक तथा लोकनियुक्त सरपंच श्री. आण्णासाहेब माळी हे होते तर व्यासपीठावर उपसरपंच श्री. किशोर धोंडीराम हरिश्चंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर हरिश्चंद्रे,उपाध्यक्ष सौ. जयश्री कल्हापूरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. बाळासाहेब लटके, स्कॉड्रन श्री. कोंडीराम कल्हापुरे, ज्येष्ठ साहित्यिक शिक्षकनेते नेते श्री.संजय कळमकर, तालुका गटशिक्षण अधिकारी श्री.गोरक्षनाथ नजन, ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वांबोरी स्टेशन श्री, अंशाबापू आवारे, श्री.जॉनी पवार, श्री.संदीप खळेकर, युवा नेतृत्व अमोल हरिश्चंद्रे, श्री. व्ही. टी.हरिश्चंद्रे, श्री. सुदर्शन शिंदे श्री.राजेंद्र ठाणगे सौ.जयश्री झरेकर,श्री. विठ्ठल वराळे, श्री. रवींद्र थोरात, श्री. अनिल कल्हापुरे, श्री.आण्णासाहेब शेळके, श्री.बाळासाहेब कल्हापुरे, मा. उपसरपंच,श्री. गणेश पारे,अझर पठाण,मयूर शेळके, आदी. शिक्षक आणि पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

    बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी अमृत महोत्सवी वर्ष केंद्रस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यावेळी सुमारे २९ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये केंद्रस्तरीय स्पर्धा सुंदर हस्ताक्षर- चि.अतुल हरिश्चंद्रे, विविध गुणदर्शन- कुमारी प्राची सचिन कल्हापुरे, कु.प्रांजल, वेशभूषा- कु. वैष्णवी विजय दुबे, पाढे पाठांतर स्पर्धा, इयत्ता तिसरी- कु.समृद्धी खोमणे, चि.प्रेम नन्नवरे,अथर्व काल्पुहारे, इयत्ता ४ थी- अनिषा हरिश्चंद्रे ,पहिली- सार्थक रसाळ,इयत्ता ०२ री- माऊली पाले,भक्ती दळवी या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.

  ‘ तर कु.वैष्णवी विजय दुबे ,जैद अझहरुद्दिन पठाण या दोन विद्यार्थिना या शाळेचे आदर्श विदयार्थी म्हणून घोषीत केले. तसेच त्यांना सुवर्ण पदक देउन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

 

‘प्रतिभाविष्कार’ “जल्लोष चिमुकल्यांचा” वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न..!!

       या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या सुंदर गीताने प्रथम तुला वंदितो गणराया ने झाली. भवानी मातेचे जोगवा,गुलाबाची कळी, धनी मलाही दाखवाना विठुरायाचे पंढरी, हिंदी चित्रपट बाजीराव मस्तानी- मल्हार, पुष्पा, कोळी नृत्य – मी हाय कोळी, नाचतो डोंबारी, आगळ्या वेगळ्या विनोदी बातम्या, लावणी नृत्य – चंद्रा, केळेवाली, सैराट- झिंग-झिंग झिंगाट, बैलगाडा शर्यत,, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – माझा भिमराया, देशभक्तीपर गीत – ये देश है विर जवनोंका, पिंगा, तू शायर है शेतकरी गीत – कांदा अन भाकर घ्यावद्या कि, शेतकरी आत्महत्या या विषयावर – ईडा पिडा टळुदे बळीच राज्य येऊ दे, टिपरी नृत्य, नाटक, एक पात्री कला, आदि. दर्जेदार आणि बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

अधिक लक्षवेधी म्हणून छञपती शिवाजी महाराजांचा ‘पोवाडा’ हा अतिशय दर्जेदार,रोमहर्षक, आणि अंगावर शहारे आणणारा ठरला.

  या चिमुकल्यांनी उपस्थीतित रसिक प्रेक्षक, पालक वर्गाकरीता या सारखे अप्रतिम कार्यक्रम संपन्न केले. यारिता शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी कठोर परिश्रम घेतलेले दिसून आले. सहभागी सर्व विद्यार्थीनी अतीशय सुंदर मेकअप, ड्रेपरी, ईतर आवश्यक ती सर्व तयारी केली. होती.

     हा सर्व सनेहसंमेलानाचा कार्यक्रम, बहारदार गीते, नाटक, लावणी, लोकगीते, शेतकरी गीत, कोळी गीते याकरिता पूर्वतयारी ही शाळेचे शिक्षक, शिक्षिका सौ. एम.एम.विप्रदास, एम. आर. कुलट, सौ. एम. एफ.कोष्टी,सौ. एम.एस. फलके, श्री. आर.एम. जाधव, श्री. लक्ष्मण हरिश्चंद्रे या सर्व शिक्षक आणि पालक यांनी मेकअप, वेशभूषा तसेच कठोर मेहनत घेत सर्व बारीक सारीक तयारी करून रंगीत तालीम पूर्ण करून घेतली होती.

या करिता समस्त गावकरी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद,माता पालक संघ, सर्व युवक मंडळ, आजी माजी विद्यार्थी वृंद,ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती चे सर्वच सदस्य, विद्यार्थी प्रतिनीधी, ग्रामपंचायत सदस्य, समस्थ पालक वृंद यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यांचे मनापासून आभारही मानले.

       ” पंचायत समितीचे माजी उपसभापती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझी उपस्थित सर्व पालकांना विनंती आहे की ही शाळा आपलीच आहे आपले पाल्य हे आपल्याच गावातील आपल्या शाळेत शिक्षणासाठी पाठवावेत तसेच या ठिकाणच्या सर्व शिक्षकांना माझे आव्हान राहील की आपणही या सर्व मुलांना अतिशय दर्जेदार शिक्षण देण्यात कुठलीही कमतरता भासू देऊ नये या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करावेत असे त्यांनी या वेळी सांगितले.”

____________________________________________

   “खडांबे खुर्द प्राथमिक शाळेला आज मी दुसऱ्यांदा भेट देत आहे. मला मला सांगण्यात आनंद होत आहे की मी ज्यावेळेस पहिल्यांदा शाळेला भेट दिली तेव्हा मी दुपारच्या सुट्टीमध्ये आलो होतो तेंव्हा जेवणाची सुट्टी झाली होती. तेव्हा त्यातील काही विद्यार्थी हे आपले जेवण आठपून आपल्या आभ्यासात मंत्रमुग्ध होते म्हणून मला या शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन करावेसे वाटते. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाबरोबरच शिस्तही लावण्याचे काम आपण करत आहात विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण करण्यासाठी ही आपण महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच यापुढेही आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवून विद्यार्थ्यांचे अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील राहावेत.”

– श्री. गोरक्षनाथ नजन, ( तालुका गटशिक्षण अधिकारी)

 

     ‘प्रतिभाविष्कार’ “जल्लोष चिमुकल्यांचा” हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०२३ प्रसंगी उपस्थित पालक आणि ग्रामस्थ यांनी रूपये ६४,०००/- इतकी लोक वर्गणी जमा केली आहे. जमा झालेल्या रकमेतून आपण शाळा सुशोभीकरण, किँवा अन्य आवश्यक बाबी करीता योग्य ठिकाणी हा निधी खर्च करत असतो असे शाळेचे शिक्षक रावसाहेब जाधव यांनी सांगितले. तसेच शिक्षवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर हरिश्चंद्रे यांनी मिळून एकूण रु.२१०००/- चे ट्रॅकसुट चे वाटप करण्यात आले.

      स्नेहसंमेलनासाठी उपस्थीत सर्व शिक्षक वृंद ग्रामस्थ, पालक,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, माता पालक संघ, सर्व युवक मंडळ, आजी माजी विद्यार्थी यांना भोजन व्यवस्था ही ग्रामपंचायत खडांबे खुर्द यांच्यावतीने करण्यात आली होती. म्हणून शाळेच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे आभार श्री. जाधव यांनी मानले.

   सहभागी चिमुकल्यांना नृत्य कला सादरीकरणाकरीता सौ. एम. आर. कुलट, सौ. एम. एफ.कोष्टी,सौ. एम.एस. फलके, श्री. आर. एम. जाधव, यांनी परिश्रम घेतले.

 कार्यक्रमांचे प्रस्ताविक सौ. एम.एम.विप्रदास यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच श्री.संजय कल्हापुरे, श्री.अंशाबापू आवारे, श्री.एम.आर.कुलट यांनी मानले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे