राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत ७ कोटी ३७ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने….
राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत ७ कोटी ३७ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने….
एकेकाळी सामाजिक क्षेत्रात नावाजलेल्या घरपोहच ठेवी देण्याची ख्याती असलेल्या राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेत ७ कोटी ३७ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली.
१६ जानेवारी २००३ रोजी १९ वर्षापूर्वी स्थापना झालेल्या या संस्थेने सुरुवातीच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबविले. कोणत्याही अर्थ संस्थेत लेखा परीक्षक हा त्या संस्थेचा आरसा असतो. त्याने संस्थेत असलेले गुणदोष वेळोवेळी निदर्शनास आणून द्यायचे असतात. या संस्थेत तसे न होता २०१६ व २०१७ या आर्थिक वर्षापासून ते ३१ मार्च २०२१ अखेर लेखा परीक्षकांनी हेतू पुरस्पर डोळेझाक करून त्यावर पांघरून घालण्याचे काम केले. या कालावधीत डी. व्ही. बोंबले, एस. एम. पवार, डी. एस. बंगाल यांनी लेखापरीक्षण केले. संस्थेत झालेल्या या अपहारास कारणीभूत असलेल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांसह लेखा परीक्षकां विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून संस्थेच्या ठेवीदारांना न्याय द्यावा. अशी मागणी ही ठेवीदारांनी केली आहे. संस्थेचे लेखा परीक्षण शासकीय लेखा परीक्षक एस. पी. धनवडे हे करीत आहे.