जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांना निलंबित करा आमदार हेमंत ओगले यांची अधिवेशनात मागणी
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांना निलंबित करा आमदार हेमंत ओगले यांची अधिवेशनात मागणी.
टाकळीभान (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी महिलेच्या प्रस्तुतीसाठी झालेल्या अवहेलनेबाबत आमदार हेमंत ओगले हे नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशनात आक्रमक झालेले दिसून आले. आरोग्य यंत्रणेबाबत निष्काळजी असलेले तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांना निलंबित करा अशी मागणी नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार ओगले यांनी केली आहे.
टाकळीभान येथील आरोग्य केंद्रात आदिवासी महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन देखील उचलला नाही तसेच त्या ठिकाणी उपलब्ध असलेले रुग्णवाहिकेची चावी देखील त्यांच्याकडेच असल्याचे समजले शेवटी सदर महिलेला खाजगी वाहनातून दुसऱ्या आरोग्य केंद्रात देण्यात आले नशीब बलवत्तर म्हणून महिला सुखरूप आहे परंतु सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोग्य यंत्रणेबाबत आमदार ओगले यांनी सभागृहात प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आरोग्य केंद्रांच्या बाबतीत अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या असून त्याबाबत लवकरच उपायोजना केल्या जातील आणि पुढे देखील नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी मला अथवा युवा नेते करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील आमदार ओगले यांनी केले आहे.
हिवाळी अधिवेशन संपताच आपण सगळ्या आरोग्य केंद्रांना भेटी देणार असून याबाबत लवकरच तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येईल आणि आरोग्य केंद्रांच्या यंत्रणेचा देखील आढावा घेण्यात येईल असे देखील आमदार ओगले यांनी सांगितले आहे.