विद्रोही आदिवासी महासंघाच्या प्रयत्नाला यश आदिवासी दफनविधी साठी मिळाली ४० गुंठे जमीन
विद्रोही आदिवासी महासंघाच्या प्रयत्नाला यश आदिवासी दफनविधी साठी मिळाली ४० गुंठे जमीन
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी भिल्ल समाजाचा जमीन नसल्या कारणाने दफनविधी कोठे करावा हा प्रश्न उपस्थित असताना आदिवासी समाजातील महिला बाबई गंगाधर माळी ही महिला मृत पावली असून तिचे अंत्यसंस्कार भोकर येथील भिल्ल दफन भूमीत होणार होता परंतु काही गावच्या बड्या लोकांनी दफन विधी जागेकडे जाऊ दिले नसल्यामुळे ही जागा तुमची दफनभूमी नाही असे सांगत दफनविधी करण्यास नकार दिल्यामुळे . भोकर गावातील आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांनी थेट भोकर ग्रामपंचायत समोर खड्डा खोदून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. दिलीप भाऊ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख मा. बाळासाहेब गांगुर्डे घटना स्थळी उपस्थित होऊन श्रीरामपूर तालुक्याचे मा.तहसीलदारसाहेब ,प्रांतसाहेब ,पोलिस अधिकारी, मंडल अधिकारीओहळ साहेब,.तलाठी पोलीस पाटील ,सरपंच यांना लगेच ग्रामसेवक यांनी फोन करून झालेला प्रकार सांगितले काही वेळात सर्व अधिकारी दाखल झाले.बाळासाहेब गांगुर्डे व अधिकारी यांच्या मध्ये चर्चा झाली . आदिवासी समाजाचे रूढी परंपरा वेगळी आहे आम्हाला आमच्या हक्क व अधिकार पासून कोणीही वेगळ करू शकत नाही तहसीलदार साहेब यांनी सांगितले की या पूर्वी अशी गोष्ट येथे घडली होती. त्या वेळी आम्ही आदिवासी भिल्ल समाजाला 40 आर हे क्षेत्र दफनविधी साठी देण्याचे आश्वासन दिले होते व ते काम लवकर पूर्ण करणार. आहोत परंतु बाळासाहेब गांगुर्डे यांनी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरत कल करो से आज करो या प्रमाणे लगेच कर्यवाही करा .नाहीतर हा दफन विधी ग्रामपंचायत समोरच करावा लागेल असे सर्व भिल्ल बांधवांनी अधिकाऱ्यांना ठाम पने सांगितले.भिल्ल समाज एकही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते नंतर लगेच सदर दफनविधी साठी फॉरेस्ट ची 40 .आर जागेची मोजमाप करून भिल्ल समाजा ला जमीन मिळुन दिली व तिथे सदर महिलेचे अंत्यसंस्कार करण्यास अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. दफनभूमीचा प्रश्न सुटल्यामुळे भोकर येथील आदिवासी समाजाने विद्रोही आदिवासी महासंघाचे बाळासाहेब गांगुर्डे ,प्रकाश माळी तसेच सर्व भिल्ल समाजाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले