गुन्हेगारी
आदिवासी महिला धिंड प्रकरणी श्रीरामपूर प्रांत अधिकारी यांना निवेदन

आदिवासी महिला धिंड प्रकरणी श्रीरामपूर प्रांत अधिकारी यांना निवेदन
मणिपूर मध्ये चाललेल्या हिंसेचा तसेच दोन महिलांना निर्वस्त्र पणे भर रस्त्यावर नग्न अवस्थेत धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी संपूर्ण भारतामध्ये विविध आदिवासी संघटना मार्फत निवेदन देऊन निषेध व्यक्त होत आहे तसेच मणिपूर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा घेण्यात यावा त्याप्रमाणे मणिपूर मध्ये राष्ट्रपती शासन राजवट लागू व्हावे अशा निवेदनामध्ये होत आहे त्याच अनुषंगाने श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देखील राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या नावे कैलास दादा माळी आदिवासी एकता परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा अध्यक्ष देविदास भाऊ पवार यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी ज्ञानेश्वर निकम कानिफनाथ पवार पपु मोरे माधव गायकवाड दिलीप आहेर उपस्थित होते