श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदी नारायण काळे यांची निवड…
श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदी नारायण काळे यांची निवड…
टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथील भाजपचे निष्ठावंत व गोरगरिबाचा कैवारी धडाडीचे युवा कार्यकर्ते तसेच जिल्हा पंचायत राज समितीचे अध्यक्ष व माजी जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नारायण हरिभाऊ काळे यांची श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. नुकतीच नवीन सदस्य कार्यकारिणी जाहीर होऊन यामध्ये त्यांचे नाव समिती सदस्य यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नारायण काळे यांनी अद्याप पर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला असून त्याची दखल तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना ही संधी दिली आहे.
शासनाच्या उज्वला गॅस योजना, संजय गांधी व इंदिरा गांधी निराधार योजना , श्रावण बाळ योजना, नवीन रेशन कार्ड व दुबार रेशन कार्ड, कामगारांसाठी मध्यान भोजन योजना, बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजना, शेतकरी सन्मान योजना, वयोश्री योजना, नवीन ड्रायव्हिंग लायसन, दिव्यांगांना साहित्य वाटप, अशा विविध शासकीय योजनांचा लाभ काळे यांनी अद्याप पर्यंत विविध शिबिर व कॅम्प घेऊन टाकळीभान व परिसरातील नागरिकांना दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल अहमदनगरचे पालकमंत्री व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते, जिल्हा संघटन मंत्री नितीन दिनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, माजी सभापती नानासाहेब पवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष गणेश मुद्गुले, माजी चेअरमन राहुल पटारे, तालुका सरचिटणीस मुकुंद हापसे, उपसरपंच कान्हा खंडागळे, युवक नेते भाऊसाहेब पवार, आदींनी अभिनंदन केले,