आदिवासी एकता परिषद भारत ,महसूल विभाग, पंचायत समिती कार्यालय श्रीरामपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भिल्ल समाजाला जात प्रमाणपत्र वितरीत

आदिवासी एकता परिषद भारत ,महसूल विभाग, पंचायत समिती कार्यालय श्रीरामपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भिल्ल समाजाला जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंभ येथे आज दिनांक 16 /3 /2024 रोजी कैलास दादा माळी यांच्या अध्यक्षतेखाली व शिंदे मॅडम तलाठी. तावरे म़ँडाम ग्रामसेविका तसेच ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी चिंधे उपसरपंच अण्णासाहेब मार्कड सदस्य साहेबराव भोसले दत्ता माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दाखल्यांचे वितरण करण्यात आले प्रसंगी कैलास दादा माळी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीतील भिल्ल समाजाला जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम होत आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाने सदर योजनेचा लाभ घेऊन जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे कारण जात प्रमाणपत्र हीच विकासाची पहिली पायरी असून जात प्रमाणपत्रापासूनच सर्वांगीण विकासाला सुरुवात होते म्हणून आदिवासी एकता परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भिल्ल समाजाला जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम फार मोठ्या झपाट्याने होत आहे आज गळनिंब तालुका श्रीरामपूर व उंबरगाव तालुका श्रीरामपूर तसेच वांगी तालुका श्रीरामपूर येथे जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे रामेश्वर जाधव रामकिसन सोनवणे बबन मामा आहेर रमेश माळी अंबादास गोलवड विश्वनाथ मोरे लक्ष्मण माळी छबबाई आहेर छबबाई माळी सुगंधा आहेर चंद्रकला माळी कविता खैरे शीलाताई मोरे कांचन माळी संगीता माळी त्याचप्रमाणे शबरी माता स्वयंसहायता बचत गट शिवशक्ती स्वयंसहायता महिला बचत गट एकलव्य स्वयंसहायता बचत गट या बचत गटांना पंचायत समिती श्रीरामपूर शिध्देश्वर स्वयमसहाय्यता बचत यांना श्री अशोक रास कटला प्रभाग प्रमुख तसेच गळनिंब येथील सीआरपी स्वाती भागवत यांच्याकडून बचत गटांना वर्ग झालेले अनुदानाविषयी माहिती देण्यात आली शेकडो विद्यार्थी महिला पुरुष यांना जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम झाले ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचे आव्हान कैलास दादा माळी यांनी केलं आहे म्हणून समाजातील सर्वच सामाजिक संघटना संस्था यांनी सहभागी होऊन समाजाला लाभ मिळवून देण्याचे काम करावे असे सुचित करण्यात आले .