विनयभंगाच्या गुन्ह्यात तलाठ्यास पावणे दोन वर्ष कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा.-श्री.आर.के.गागरे

*विनयभंगाच्या गुन्ह्यात तलाठ्यास पावणे दोन वर्ष कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा.-श्री.आर.के.गागरे
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत 19 8 2019 रोजी बारागाव नांदूर येथे घडलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा (राहुरी पो.स्टे.गु.र.न.६८९/२०१९ भा.दा.वी.क.३५४,३२३,५०४,५०६,३४ ) तपास पोलीस नाईक प्रवीण खंडागळे नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन यांनी केलेला होता. सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र मान्य न्यायालयात सादर केल्यानंतर राहुरी येथील मा न्यायालय क्र. १ श्रीमती ए.एस.वाडकर यांचे कोर्टात सदर गुन्ह्यातील आरोपी –
संदीप नवनाथ नेहरकर (तलाठी) यास मा न्यायालयाने भा.द.वी.क.३५४ खाली एक वर्ष सहा महिने साधा कारावास व दंड रु.3000/-
दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास तसेच भा.द.वी.क.३२३ खाली 3 महिने साधा कारावास तसेच दंड रु.१०००/- दंड न भरल्यास १५ दिवस साधा करावास. दंडाची रक्कम मुळ फिर्यादीस देण्याचा हुकूम अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री.आर.के.गागरे यांनी कामकाज पाहीले. सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासून साक्षीदारांच्या साक्षीवर तसेच सरकारी पक्षाच्या युक्तीवाद ग्राह्य धरून सदर शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.राहुरी पोलीस स्टेशन च्या वतीने कोर्ट पैरवी पो.शिपाई श्री विनोद उंडे, भगवान थोरात यांनी साक्षी कामी समन्वय साधलेला आहे.