राजळेंवर लोहगावात गोळीबार सोनई पोलीस स्टेशनला ॠषीकेश शेटे सह अन्य तीन जनावर गुन्हा दाखल
मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राजळेंवर लोहगावात गोळीबार सोनई पोलीस स्टेशनला ॠषीकेश शेटे सह अन्य तीन जनावर गुन्हा दाखल
सोनई–राज्याचे जलसंधारणमंञी व नेवासा तालुक्याचे सर्वेसर्वा नेते नाम.शंकरराव गडाख यांचे खाजगी स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर काल राञी साडेनऊ दहाच्या सुमारास लोहगाव शिवारात गोळीबार झाला.हल्लेखोरांनी फक्त दहशत माजवण्यासाठी पायावर गोळीबार केला.राहुल राजळे यांच्या मांडीत गोळी घुसली.नंतर हे अज्ञात हल्लेखोर पसार झाले.
गेली अनेक वर्षापासुन नाम.शंकरराव गडाख यांचे काम पाहत असलेले राहुल राजळे अंत्यत शांत स्वभावाचे म्हणूण परिचित आहेत.राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी लोहगाव या ठिकाणी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना दहाच्या रात्रीच्या सुमारास घडल्या नंतर वाराच्या वेगाने नेवासा तालुक्यात बातमी पसरली.सध्या वाढत असलेल्या राजकिय स्पर्धेतुन हा हल्ला झाला असावा अशी चर्चा नेवासा तालुक्यात सुरू आहे.सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे मॅक्स केअर हासपिटल येथे तोफखाना पोलीसाना दिलेल्या जबाबात दिलेल्या वरुन राहुल राजळे यांचे बंधू विकास जनार्दन राजळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यात नितीन शिरसाठ रा वाजोळी बबलु लोंढे संतोष भिगारदिवे व ॠषीकेश वसंत शेटे व इतर दोन ते तीन अनोळखी विकास यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की नितीन शिरसाठ बबलु लोंढे संतोष भिगारदिवे यांनी ॠषीकेश वसंत शेटे रा सोनई यांचे सांगण्यावरूनच त्याचे कडील पिस्तुलातुन राहुल राजळे वय २९ यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे वर फायरिग करुन त्यास जख्मी केले शिवीगाळ व दमदाटी केली अशी फिर्याद विकास राजळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे त्या नुसार सोनई पोलीस ठाण्यात वरील आरोपी विरोधातील गुन्हा र न १२४/२०२२भा द वि कलम ३०७’३२३*५०४;१४७;१४८;. १४९; शस्त्र अधिनियम ३/२७ पोलीस अधिनियम ३७(१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सोनई पोलीस करीत आहेत हे