सोनई पोलिसांवर कारवाईसाठी ग्रामस्थांचा पोलिस स्टेशनवर मोर्चा.

सोनई पोलिसांवर कारवाईसाठी ग्रामस्थांचा पोलिस स्टेशनवर मोर्चा.
सोनई-सोनई पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन बागुल,उपनिरिक्षक उमेश पतंगे,रायटर संजय चव्हाण व इतर अनोळखी कर्मचारी यांनी गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते याला समज देण्याच्या नावाखाली बेदम मारहाण केली.तसेच सोनईतील एक अल्पवयीन 17 वर्षाचा अनुसुचित जातीचा मुलगा तुषार देव्हारे याला सोनई पोलिसांनी समज देण्याच्या नावाखाली बेडी घालुन दमदाटी केली.याच्या निषधार्थ व दोषीवर कारवाईसाठी सोनई पोलिस स्टेशनवर ग्रामस्थाच्या वतीने विराट मोर्चा नेण्यात आला.सोनई परिसरातील युवकांच्या वतीने अतिशय शांतेच्या मार्गाने छञपती शिवाजी महाराज चौक ते सोनई पोलिस स्टेशनवर रांगेने शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चा सोनई पोलिस स्टेशनवल आला असता शेवगावचे विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे रामचंद्र कर्पे यांनी मोर्चाला सामोरे जात संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत दोषी पोलिष अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन स्विकारले.यावेळी रेणुका देव्हारे,सामाजिक कार्यकर्त्या व्दारकाभाभी कुमावत, मानवाधिकार आयोग कार्यकर्ते प्रसाद घोगरे,चंदु आगे,भारत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त मांडत निषेध व्यक्त केला.यावेळी रेणुका देव्हारे यांनी माझा सतरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा तुषार देव्हारे याला कुठलाही गुन्हा दाखल नसताना सोनई पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन बागुल व सहकारी पोलिस यांनी विना सर्च वारंटचे ताब्यात घेत हातात बेडया घालुन आरोपी प्रमाणे ताब्यात घेत दमदाटी केली.माझा मुलगा काम करून शिक्षण घेत असताना पोलिसांनी त्याला काही गुन्हा नसताना ताब्यात घेत दमदाटी केली.यामुळे एका शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलाचे भवितव्य बरदाद करण्याचे काम पोलिसानी केले.गावातील चार पाच लोकांच्या सांगण्यावरून पोलिस स्टेशनचा कारभार चालतो असे असेल तर पोलिस स्टेशन हे गुन्हेगारी घडवण्याचा अड्डा झाला आहे.सोनई पोलिस स्टेशनच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया समोल उपोषणाला बसणार असल्याचे रेणुका देव्हारे म्हणाल्या.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या द्वारकाभाभी कुमावत यांनी अपराध नसताना पोलिसानी अमानुषपणे मारहान केल्याबद्दल निषेध व्यक्त करत एका अल्पवयीन मुलाला गुन्हा दाखल नसताना ञास पोलिसांनी ञास दिला याला न्याय मिळावा यामुळे भविष्यात काळ सोकावणार नाही असे द्वारकाभाभी कुमावत म्हणाल्या.मानवाधिकार आयोगाचे कार्यकर्ते प्रसाद घोगरे यांनी राजेंद्र मोहिते याच्यावर झालेल्या अन्याया बाबत व अल्पवयीन मुलाला बेडया घातल्या प्रकरणी शांतेतेच्या मार्गाने मानवाधिकार आयोगा मार्फत दोषीवर कारवाईसाठी लढा देणार असल्याचे घोगरे यांनी सांगितले.युवक कार्यकर्ते भारत शिंदे यांनी आपल्या भावना तिव्र शब्दात व्यक्त करत पोलिसावर कारवाईची मागणी केली.यावेळी सर्व आंदोलन कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत शेवगाव विभागीय पोलिस उपधिक्षक सुदर्शन मुंडे यांनी राजेंद्र मोहिते व तुषार देव्हारे यांचे जबाब घेवुन मेडिकल रिपोर्ट नुसार जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे अहवाल पाठवुन प्रशाकिय पातळीवर चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुंडे यांनी मोर्चास संबोधन करताना दिले.यावेळी मोठा फौज फाटा तैन्यात करण्यात आला होता.