शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता अपघात व वाहतुक नियमांबद्दल जनजागृती होणे गरजेचे…पो,नि, दशरथ चौधरी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता अपघात व वाहतुक नियमांबद्दल जनजागृती होणे गरजेचे…पो,नि, दशरथ चौधरी
वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघातात दर एका मिनीटाला चार लोक मरण पावतात म्हणुन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता अपघात व वाहतुक नियमांबद्दल जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भोकर येथे जगदंबा प्रासादिक विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पो.पाटील बाबासाहेब साळवे होते तर प्रमुख अतीथी पो, नि, दशरथ चौधरी यांचे हस्ते शालेय परीवहन प्रकल्प स्पर्धेत कु,जागृती मते,चि.निशांत गायकवाड,चि.श्रेयस विधाटे यांना प्रमाणपञ देण्यात आले.
यावेळी पो.नि.चौधरी म्हणाले की कायद्यानुसार पालकांनी मुलांना सज्ञान झाल्याशिवाय वाहन देणे टाळावे अन्यथा वडीलांना जेलमध्ये जावे लागेल. विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया न घालवता योग्य ध्येय ठरवावे व यु,पी, एस, सी, एम, पी, एस, सी, सारख्या परीक्षा देऊन मोठे अधिकारी व्हा व आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करा असे अवाहनही चौधरी यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात पो,पाटील बाबासाहेब साळवे म्हणाले कि शालेय परीवहन समीतीव्दारेचा हा उपक्रम अतीशय स्तुत्य असुन या वयातच शालेय विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे तरी पालकांनी यासाठी काळजी घेऊन मुलांना वाहन देणे टाळावे असे त्यांनी सांगीतले. यावेळी मा.मुख्याध्यापक भिमाशंकर शेळके,व पञकार चंद्रकांत झुरंगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पो,ना,अनिल शेंगाळ, मा.अध्यक्ष सुरेश अमोलिक, शाळा व्यावस्थापण अध्यक्ष भाऊराव सुडके,भाजपा संघटक सतीश शेळके,पञकार हरीभाऊ बिडवे, जि.प.प्रा.शाळेचे अध्यक्ष सोमनाथ पंडीत, मुख्याध्यापक जालिंदर पोखरकर,सुरेंद्र पेठकर,श्रीमती कल्पना म्हस्के,रविकांत डोखे श्रीमती दिपाली पाटील, बाळासाहेब मुजगुले, सुभाष साबळे,अशोक राहिंज, श्रीमती गीतांजली मोरे,श्रीमती प्रांजल गवारे, प्रशांत सारंगधर, अरुण भोमले, नितीन कोहक,सुधीर बोरकर, संजय सकट,भाऊसाहेब शेळके,श्रीमती गीताबाई शेळके,यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन डाँ अविनाश महाजन यांनी केले तर आभार सचिन शिंदे यांनी मानले