टाकळीभान येथील संविधान ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या गटात प्रवेश.

टाकळीभान येथील संविधान ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या गटात प्रवेश.
टाकळीभान येथील संविधान ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून संविधान ग्रुप गावातील सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या भारत राष्ट्र समिती ह्या पक्षात प्रवेश केला आहे. टाकळीभानमध्ये मुरकुटे – ससाणे यांची युती अभेद्य असून आता संविधान ग्रुपने देखील मुरकुटे गटात प्रवेश केल्याने युतीची ताकद आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुरकुटे गटाचे कार्यकर्ते ह्या प्रवेशासाठी प्रयत्नशील होते, काल अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि संविधान ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मुरकुटे गटात प्रवेश केला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब रणनवरे, सुंदर रणनवरे, शामराव खरात, मधुकर रणनवरे, जॉन रणनवरे, अनिता तडके, बाळासाहेब बोडखे, शंकर रणनवरे,भरत आसरमोल, सतीश रणनवरे,अनिल रणनवरे,संदीप शिनगारे यांच्यासह संविधान ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांचा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते सत्कार करत छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला.