आळंदी नगर परिषदेची शहराला विदृप करणाऱ्या जाहिरात फलकावर कारवाई*

*आळंदी नगर परिषदेची शहराला विदृप करणाऱ्या जाहिरात फलकावर कारवाई*
*मात्र वाहतुकीत अडथळा होईल अशी वाहने रोडवर पार्किंग केल्याने नागरिकांना त्रास कायम*
आळंदी नगर परिषदेने शहराला विद्रुप करणाऱ्या जाहिरात फलकावर आज कारवाई केली वाहतूक असलेल्या रस्त्यांवर विद्रुप पणे फलक लावल्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात होती मागील काळात आळंदी नगरपालिकेने मोठ्या स्वरूपाची अतिक्रमण कारवाई केली. त्यानंतर पुन्हा आळंदीच्या रस्त्यावर जागोजागी चुकीच्या पद्धतीने जाहिरात फलक लावण्यात आले होते. यातील बरेचसे फलक हे मोडकळीस आल्यामुळे रस्त्यात पडून वाहतुकीला अडथळा होऊन तसेच अपघात होतील अशी शक्यता होती आणि नागरिकांना ईजा होण्याची शक्यता मात्र जास्त होती. या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी कारवाई करत सर्व जाहिरात फलक तात्काळ काढण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. मात्र रहदारीच्या ठिकाणी अडथळा होईल अशाप्रकारे चार चाकी वाहने रस्त्याला पार्क केल्याने नागरिकांना मात्र रस्त्यावर चालने साठी तारांबळ उडत आहे. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने चार चाकी वाहने पार केलेने तसेच पार्किंग नसलेल्या ठिकाणी तासन तास वाहने लावले जात असल्याने अपघाताची संख्या निश्चितच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच चार चाकी वाहने कुठेही पार्क केल्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड होत असलेणे या वाहनांवर आळंदी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.