बेलापूरचे जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांना मातृशोक
बेलापूरचे जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांना मातृशोक
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकरी कुटूंबातील व जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या मातोश्री गं.भा.अंजनाबाई अगस्ती देसाई (वय-95) यांचे सोमवार दि.23 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले
त्यांचे पश्चात चार विवाहीत मुले, तीन विवाहीत मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना व परतवंडे असा मोठा परीवार आहे. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक, बेलापूर पत्रकार संघाचे सचीव, संक्रापुर सोसायटीचे संचालक व प्रगतशिल शेतकरी देविदास देसाई, तसेच बेलापूर एज्यूकेशन सोसायटीच्या कमालपूर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सेवक भागवत देसाई (सर), व गुजरात येथील सिमा सुरक्षा दलातुन सेवा निवृत्त सैनिक हवालदार मेजर बाबासाहेब देसाई यांच्या त्या मातोश्री होत.
तसेच बीड येथे कार्यरत असलेले सहाय्यक लेखाधिकारी अनिरूद्ध देसाई व नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवुन जलसंधारण पद मिळविलेले बेलापूर येथील अभिषेक देसाई यांच्या त्या आजी होत.