*डॉ अंबालाल यांची नीती आयोग द्वारासंचालित रक्षा परीषद च्या महाराष्ट्र राज्य संयोजक नियुक्ती बद्दल धानोरे ग्रामस्थनी केला सत्कार*

*डॉ अंबालाल यांची नीती आयोग द्वारासंचालित रक्षा परीषद च्या महाराष्ट्र राज्य संयोजक नियुक्ती बद्दल धानोरे ग्रामस्थनी केला सत्कार*
*महाराष्ट्र राज्यातील आदर्श* *जिल्हा परिषद शाळा धानोरेचे मुख्यध्यापक आणि सरपंच यांनी केला ग्रामस्थांचे वतीने केला सत्कार*
आळंदीच्या जवळील धानोरे गावात सुमारें २० वर्षा पासून कार्यरत असलेले डॉ अंबालाल यांचा धानोरे चे सरपंच अनिल गावडे तसेच महाराष्ट्र राज्यात आदर्श शाळा म्हणून नाव लौकीक मिळव ने साठी सिंहाचा वाटा असणारे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे सर यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या संयोजक पदी डॉ. अंबालाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ अंबालाल पाटील हे अनेक वर्षांपासून वैद्यकिय,सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, धार्मिक, राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत, डॉ. अंबालाल पाटील हे वैद्यकिय सेवेनिमित्त गेल्या विस वर्षांपासून धानोरे तसेच आळंदी देवाची, पुणे येथे कार्यरत आहेत, ते केदारेश्वर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तर काँग्रेस डॉक्टर सेलच्या, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस, सांगली जत कॉंग्रेस विधानसभा मतदार संघाचे पक्षनिरीक्षक तसेच अनेक संघटनांच्या पदावर काम करण्याचा त्यांना प्रदिर्घ अनुभव आहे.
डॉ. अंबालाल पाटील यांची नीती आयोग (भारत सरकार) द्वारा नोंदणीकृत भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या (Human Rights council of india) “महाराष्ट्र राज्याच्या संयोजक” पदी नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचे आदेश निवृत्त न्यायाधीश व ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष ब्रिन्दावन मंडल यांच्या सल्ल्याने व श्री. जनार्धन मोंडल (नीती आयोग माजी सहसंचालक, ग्राहक मंचाचे चेयरमन आणि चंद्र शेखर डे (नीती आयोगाचे सरचिटणीस), महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्या द्वारे नियुक्ती करण्यात आली.
मानवाधिकार म्हणजे प्रत्येक माणसाला निसर्गदत्त मुलभुत अधिकार, हे अधिकार त्याला जन्मत:च मिळतात व सदर अधिकार अभाधित ठेवण्याची जवाबदारी प्रत्येकाची असते पण, तरीही वेळोवेळी त्यावर आक्रमण होतांना दिसते व ते अभाधित राहण्यासाठी प्रयत्नांची तसेच सतत जागरुक राहण्याची आवश्यकता असते.
आयोगाला प्राप्त होणार्या ५० टक्के केसेस कार्यक्षेत्रात न बसणारी असतात या नॉन मेन्टेनेबल केसेस संदर्भात जनजागृती करणे, मानवी हक्काचे ऊल्लंघन झालेल्या प्रकरणांची जवाबदार यंत्रणेला दखल घेण्यास भाग पाडणे, मानवतेचा प्रचार करणे आदी कार्य या माध्यमातुन केले जातात.
या निवडी बद्दल डॉ. अंबालाल पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.