राहुरी खुर्द ग्रामपंचायत वार्ड क्र. 2 मधील पोट निवडणूक जनसेवा मंडळ दुर्गेश वाघ यांना उमेदवारी

राहुरी खुर्द ग्रामपंचायत वार्ड क्र. 2 मधील पोट निवडणूक जनसेवा मंडळ दुर्गेश वाघ यांना उमेदवारी.
राहुरी खुर्द ग्रामपंचायत वार्ड क्र. 2 मधील पोट निवडणूक 2022 निमित्त जनसेवा मंडळ राहुरी खुर्द यांच्यावतीने श्री. दुर्गेश वाघ यांना उमेदवारी दिली असून आज दिनांक 28 मे 2022 रोजी बुवासाहेब महाराज मंदिर येथे प्रचार नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला असून जनसेवा मंडळ राहुरी खुर्द यांचे कार्यक्रम शाहूराव चांदने यांच्या अध्क्षतेखाली होत असल्याचे अशी माहिती जनसेवा मंडळाचे अध्यक्ष योगेश मालपाणी यांनी केली. कार्यक्रमा दरम्यान गेनु भाऊ तोडमल यांनी आपले मत मांडले त्यांनी भाषणात सांगितले की, ही जागा जनसेवा मंडळाची असून आम्ही समोरच्या पार्टी ला सांगितले होते की ही जागा बिनविरोध करा परंतु त्यांनी या प्रस्तावाला धुडकावून लावल्या मुळे पोटनिवडणूक करण्यास सामोरे जावे लागले. दरम्यान राहुरी पं. स. उपसभापती यांनी ही गेणू भाऊ तोडमल यांच्या भाषणास सहमती दिली. कार्यक्रमा दरम्यान शब्बीर भाई देशमुख यांनी उपस्थिती लावली, मंडळाचे अध्यक्ष योगेश मालपाणी, गेणु भाऊ तोडमल, प्रदीप भाऊ पवार उप सभापती पं. स. राहुरी, भास्करराव तोडमल, माजी सरपंच मधुकर साळवे, अय्युब भाई पठाण, रफिक भाई शेख, सतीश पावटे, चेअरमन दिलीपराव आघाव, भाऊ पागिरे, अण्णासाहेब बाचकर, ग्रा. पं. सदस्या. सौ. अश्विनीताई कुमावत, आसफ पठाण, राम तोडमल, मुकुंद शेडगे, सामाजिक कार्यकर्ते युवराज तोडमल, अशोकराव मंडलिक, दिपक जाधव, गणेश त्रिमुखे, सौरभ चांदणे, बबलू कांबळे,जगन्नाथ धोत्रे. सागर साळवे. भाऊसाहेब मन्तोडे. मनोज शिरसाठ. अविनाश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुरी खुर्द पोट निवडणूक साठी एकूण ३ अर्ज आले होते पण सौरभ चांदणे व राजु त्रिमुखे योनी जनसेवा मंडाळाचे उमेदवार दुर्गश वाघ यांना एक मुखाने पाठिंबा दिल्यामुळे राहुरी खुर्द जनसेवा मंडळाचे अध्यक्ष पप्पूशेठ मालपाणी व जनसेवा मंडळानी त्याचे आभार मानले.