पंचायत समितीने चालवलाय शेतकऱ्यांचा मानसिक छळ सरपंच बंडू नाना बसले उपोषणाला
पंचायत समितीने चालवलाय शेतकऱ्यांचा मानसिक छळ सरपंच बंडू नाना बसले उपोषणाला
गेवराई तालुक्यातील शेतकर्यांच्या जलसिंचन विहिरीचे मस्टर काढून, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी उपकार करावेत, अशी उपरोधिक विनवणी जातेगाव येथील सरपंच बंडू नाना पवार यांनी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात सरपंच पवार यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून, शेतकरी लाभधारकांचा मानसिक छळ करणाऱ्या पंचायत समितीचा निषेध केला.माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासह तालुक्यातील विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन, आंदोलनास पाठिंबा दिला.
गेवराई तालुक्यातील शेतकर्यांना एमआरईजीस च्या माध्यमातून विहिर मंजूर करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांपासून सदरील विहिरीचे मस्टर काढून शेतकर्यांना तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या विविध विभागाकडून चालढकल केली जात असून, या मागे बीडीओ श्रीमती कांबळे यांची मुक संमती असल्याचा आरोप सरपंच पवार यांनी केला आहे.शेतकऱ्यांनी विहिर खोदून कामाला सुरुवात केली आहे. मात्र, आठवड्यात एक – दोन मस्टर तयार करून सुद्धा, दहा मजुरा पैकी, केवल
एक किंवा दोन मुजुराचे मस्टर काढून बोळवण केली जात आहे. वास्तविक पहाता, फाईल मंजूर करण्यासाठी पंचायत समितीच्या चार ते पाच टेबलवर हात ओले केले जात आहेत. शेवटचा हात बीडीओ श्रीमती कांबळे यांचा असतो. तिथे ही फाईल वर जड वस्तू ठेवावी लागते. त्यानंतर, फाईल ला मंजुरी देण्यात येते. एवढे करून ही,
गेवराई तालुक्यातील अनेक शेतकरी पंचायत समितीत चकरा मारून थकले आहेत. त्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. विनंती करून ही, निराशाच पदरात पडत असल्याने, जातेगाव येथील ज्येष्ठ सरपंच बंडू नाना पवार यांनी, पुढाकार घेऊन मंगळवार ता. 3 रोजी एक दिवसीय उपोषण करून या महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून, तातडीने मागणीची दखल घेण्याची विनंती केली. पवार यांनी सांगितले की,
जेवढे मजूर मागणीवर आहेत. तेवढ्या लोकांचे पेमेंट करा. घरकुल हप्ता द्या, पंतप्रधान आवाज योजनेचा हत्पा तातडीने खात्यावर जमा करा, यासह विविध मागणीसाठी आपण उपोषण करून लक्ष वेधले असून,
प्रशासनाने तातडीने हे सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी केली आहे. शेतकर्यांच्या जलसिंचन विहिरीचे मस्टर काढून, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी उपकार करावेत, अशी उपरोधिक विनवणी सरपंच बंडू नाना यांनी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मंगळवार ता. 3 रोजी पंचायत समितीच्या आवारात सरपंच पवार यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून, शेतकरी लाभधारकांचा मानसिक छळ करणाऱ्या पंचायत समितीचा निषेध केला आहे.