आत्महत्येप्रकरणी राहुरीतील दोघा सावकारांवर गुन्हा दाखल

आत्महत्येप्रकरणी राहुरीतील दोघा सावकारांवर गुन्हा दाखल
व्याजाने घेतलेले पैसें व त्याच्या व्याजाची परतफेड करूनही वेळोवेळी व्याजाच्या पैशाची मागणी करून गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल राहुरी तालुक्यातील कात्रड येथील अजित रमेश दांगट व चेडगाव येथील किशोर तुकाराम शिंदे या दोघांविरुद्ध राहुरी पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील प्रदीप तांबे याने भाऊसाहेब तांबे राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ प्रमोद उर्फ संदीप भाऊसाहेब तांबे यांनी लोकांकडून उसने पैसे घेऊन गावातील जमीन खरेदी केली होती. लोकांचे
उसने घेतलेले पैसे त्यांना परत देण्याचे असल्याने त्याने पाच वर्षांपूर्वी कात्रड गावातील अजित रमेश दांगट व किशोर तुकाराम शिंदे (राहणार चेडगाव, तालुका राहुरी) यांच्याकडून सहा लाख रुपये हे शेकडा दहा टक्के प्रति महिन्याप्रमाणे व्याजाने घेतले होते. त्याने त्यांच्याकडून घेतलेले सहा लाख रुपये व त्यावर होणारे व्याज हे त्यांना परत दिले होते. परंतु त्यानंतरही ते दोघे प्रदीप तांबे याच्याकडे ‘तुझ्याकडे आणखी व्याज राहिले आहे ते आम्हांला दे नाहीतर तुझ्या नावावर असलेली जमीन आमंच्या नावावर करून दे असा तगादा लावत असत यावरूनच दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी
सुमारास प्रमोद उर्फ संदीप तांबे याने त्याच्या चुलत भाऊ रमेश ज्ञानदेव तांबे यांना मोबाईलवर मी औषध घेऊ का फाशी घेऊ असा मेसेज केला आणि एक चिठ्ठी टाकली त्यावर प्रमोद ऊर्फ संदीपचा चुलत भाऊ रमेश तांबे याने तू काही करू नकोस तू जेथे असेल तेथे व्यवस्थित रहा असे सांगितले त्यानंतर मयत प्रमोद उर्फ संदीप भाऊसाहेब तांबे त्याचा भाऊ प्रदीप व चुलत भाऊ हे त्याला शोधण्यासाठी निघाले असता रोडने जात असताना त्यांच्या शेतामध्ये चिंचाच्या झाडाला प्रमोद उर्फ संदीप भाऊसाहेब तांबे याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत प्रदीप भाऊसाहेब तांबे यांनी वांबोरी दरक्षेत्राशी संपर्क साधला असता पोलीस हवालदार वाल्मीक पारधी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व मयत प्रमोद उर्फ संदीप भाऊसाहेब तांबे यांचा मृतदेह चिंचेच्या झाडावरून उतरवला व त्याला वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यास मयत घोषित केले.
यावरून मयत प्रमोद उर्फ संदीप भाऊसाहेब तांबे याचा भाऊ प्रदीप भाऊसाहेब तांबे याने राहुरी पोलीस स्टेशनला अजित रमेश दांगट (राहणार कात्रड, तालुका राहुरी) व किशोर तुकाराम शिंदे (राहणार चेडगाव, तालुका राहुरी) यांच्याविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करत आहेत.