वांगी येथे श्री वीरभद्र (बिरोबा) महाराज यात्रा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात

वांगी येथे श्री वीरभद्र (बिरोबा) महाराज यात्रा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक व वांगी खुर्द येथे सालाबाद प्रमाणे, जागृत देवस्थान श्री वीरभद्र (बिरोबा) महाराज यात्रा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. या सप्ताहाचे 27 वे वर्षे असून, हरिभक्त परायण महंत परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांच्या कृपाशीर्वादाने ह.भ.प. स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, ह.भ.प. महंत अर्जुन नामदेव महाराज, ह.भ.प. किसन महाराज पवार, ह.भ.प.मच्छिंद्र महाराज चोरमले,ह.भ.प.हरी महाराज पिसाळ, ह.भ.प.यशोदानंद महाराज माने, ह.भ.प.योगेश महाराज होन, यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य सप्ताह शनिवार दिनांक 24/1/2026 ते शनिवार दिनांक 31/1/2026 या कालावधीत संपन्न होत आहे.
यामध्ये दैनिक कार्यक्रमात सकाळी पहाटे 4ते6काकडा आरती, 6 ते 7 विष्णुसहस्रनाम, 7 ते 11 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, 5 ते 6 हरिपाठ, 7 ते 9 हरिकीर्तन व 9 ते 10 रोज महाप्रसाद व नंतर हरिजागर होणार आहे.
यामध्ये कीर्तन सेवेची रूपरेषा दिनांक 24/1/2026 रोजी ह.भ.प. सचिन महाराज पवार (नेवासा), दिनांक 25/1/2026 ह.भ.प.रामानंदगिरीजी महाराज (मुक्ताई संस्थान पुणतांबा), 26/1/2026 ह.भ.प.वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर (नांदगाव नाशिक), 27/1/2026 ह.भ.प.वेदांतचार्य देविदासजी महाराज मस्के (श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा), 28/1/2026 गाथामूर्ती चांगदेव महाराज काकडे (जालना), 29/1/2026 ह.भ.प.वारकरी भूषण चैतन्य महाराज निंबोळे (श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक), 30/1/2026 ह.भ.प.गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री (श्री क्षेत्र डोंगरगण) दिनांक 31/1/2026 रोजी ह.भ.प.स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड)यांचे सकाळी 9 ते 11 या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे.
त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार असून तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी, भक्तीरसाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.



