
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सुवर्ण कलश साठी एक लाखाची देणगी माऊली चरणी अर्पण

आळंदी/श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशत्कोत्तर जन्मोत्सवानिमित्त समाधी मंदिरात 11 किलो सुवर्ण कलशाचा संकल्प सोडण्यात आला आहे. यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांचे माध्यमातून आवाहन करण्यात आलेले आहे.त्या आवाहनास प्रतिसाद देत समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांच्या माध्यमातून आळंदी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष श्री नंदकुमार कुऱ्हाडे यांनी सुमारे एक लक्ष किमतीचा धनादेश श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह भ प निलेश महाराज लोंढे यांच्याकडे सुपूर्द केला तसेच आळंदीकर ग्रामस्थ यांना सदर सुवर्ण दानाच्या सुवर्णसंधी मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे.
सदर धनादेश देत असताना आळंदी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष विलासराव घुंडरे आळंदी नगरीचे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील आळंदी नगरीचे नगरसेवक रंगनाथ रानवडे.
ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळ चे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे. वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप रंधवे. सामाजिक कार्यकर्ते सुनील रानवडे. श्री संतोष मोहन भोसले श्री विठ्ठल घुंडरे.समस्त ग्रामस्थ आळंदीकर म्हणून उपस्थित होते.तसेच या पुण्यकर्मामध्ये श्री नंदकुमार कुऱ्हाडे यांनी पुढाकार घेत, एक लाख रुपयाचा धनादेश 11 किलो सोन्याच्या कलश यासाठीदेणगी म्हणून प्रदान केला. आणि हे आमचे भाग्य आहे असे आपणास वाटत असल्याचे सांगितले आहे.



