माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा: मोहन शेगर

माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा: मोहन शेगर
माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा: मोहन शेगर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
माहिती न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा; कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप
*अहिल्यानगर*: माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती न देणाऱ्या मुळा पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, सोनईचे सामाजिक कार्यकर्ते मोहन दादा शेगर यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 02/07/2026 रोजी या अर्जाची पावती दिली आहे.
अर्जदाराने दिलेल्या माहितीनुसार, दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी मुळा उजवा व डावा कालव्याच्या 2024-25 सालातील कार्यारंभ आदेशांची सर्व माहिती मुळा पाटबंधारे विभागाकडे RTI अंतर्गत मागितली होती. मात्र, राहुरी-घोडेगाव-नेवासा विभागाचे उपविभागीय अभियंता, चिलेखनवाडी-अमरापूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच “केराची टोपली” दाखवली, असा आरोप अर्जात आहे.
दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी अपिलात गेल्यानंतरही प्रत्येक सुनावणीच्या तारखेला उपस्थित राहूनही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तसेच अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप आहे.
*गंभीर आरोप
2024-25 या आर्थिक वर्षात शासनाच्या निधीचा गैरवापर झाला असून, सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. काही कामे न करताच बोगस बिले काढल्याचे तसेच कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा संशय अर्जात व्यक्त करण्यात आला आहे.
*आमरण उपोषणाचा इशारा*
जोपर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा अर्जदाराने दिला आहे. उपविभागीय अधिकारी, अपिलीय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
*RTI कायदा 2005*
कायद्यानुसार 30 दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. मुदत ओलांडूनही माहिती न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.



