हिंदकेसरी ग्राम संघ वांगी बुद्रुक गटाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

हिंदकेसरी ग्राम संघ वांगी बुद्रुक गटाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
![]()
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक बिरोबा मंदिर परिसरामध्ये हिंदकेसरी ग्राम संघाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. ग्राम संघामध्ये 14 बचत गटाचा सहभाग आहे. 14 ही गटांनी विविध प्रकारच्या तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थाचे अगदी थाटामध्ये स्टॉल लावले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शरद नवले हे होते.
या ग्राम संघामध्ये 14 बचत गटामार्फत 142 महिलांनी सहभाग घेतल्याने खऱ्या अर्थाने, महिला सक्षमीकरण स्वतःच्या पायावर उभे होताना दिसत होते. यावेळी प्रत्येक गटाच्या अध्यक्ष व सचिव यांनी आपापल्या गटाचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कोमल माळी यांच्या सुमधुर गीताने झाली.
अध्यक्षीय भाषणात नवले यांनी महिलांमध्ये कामाची उत्सुकता आणि व्यवसाय वाढीवर भर देण्याचा सल्ला दिला. नवले पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांनी एवढा उत्स्फूर्त देताना दिसला. महिला भगिनींनी आपले आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळणे गरजेचे असते हे समजून सांगितले. रोजच्या कामाच्या दगदगीत आरोग्याकडे महिला भगिनी दुर्लक्ष करतात. खर्च कमी करणे लग्न साध्या पद्धतीने करणे उरलेले पैसे नव दापत्त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात कामाला लावणे अशा अनेक गोष्टींकडे त्यांनी महिलांची लक्ष वेधले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्वच गटांना आपले हक्काचे व्यासपीठ श्रीरामपूर शहरांमध्ये तयार करण्यासाठी मी जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हटले. तसेच स्वतःचा मोबाईल नंबर दिला व गटासंदर्भात किंवा गावातील कोणत्याही समस्या असल्यास निसंकोच संपर्क करण्याचे आव्हान त्यांनी केले. तसेच गावामध्ये महिलांसाठी आरोग्य कॅम्प लवकर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गायकवाड मॅडम यांनी बचत गटांनी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती दिली व प्रत्येक घरातील महिलांनी यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून शरद नवले, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब चितळकर, सरपंच ज्ञानेश्वर बिडगर, उपसरपंच सौ लकडे, सदस्य कांबळे, मंगल वावरे किरण ग्राम संघ कोषाध्यक्ष बेलापूर, योगिता अमोलिक आदिशक्ती समूह अध्यक्ष बेलापूर, मनीषा दळे भरारी ग्राम संघ अध्यक्ष बेलापूर, रंजना कवडे एकजूट ग्रामसंंघ कोषाध्यक्ष भेर्डापूर, गीता पोटभरे जीवन ज्योती ग्राम संघ अध्यक्ष नरसाळी, अनुराधा पारखे हिंदकेसरी अध्यक्ष वांगी बुद्रुक, बीबीता कांबळे हिंदकेसरी ग्राम संघ सचिव वांगी बुद्रुक, रोहिणी कांबळे हिंदकेसरी ग्राम संघ कोषाध्यक्ष वांगी बुद्रुक, सुवर्णा कांबळे वांगी बुद्रुक सीआरपी समुदाय संसाधन व्यक्ती, ज्योती पवार गुजरवाडी सीआरपी, मंगल कवडे भेर्डापूर सीआरपी, अर्चना जंजिरे भेर्डापूर सीआरपी, अलका पोटभरे नरसाळी सीआरपी, सरिता मोकाशी बेलापूर सीआरपी, दिपाली बनकर पढेगाव सीआरपी, वैशाली शेळके बेलापूर कृषी सखी व इतर महिला व गावकरी उपस्थित होते



