वांगी बुद्रुक मध्ये एक तर पाऊस तर दुसरीकडे लाख कॅनॉल ने शेकडो एकर पिकाचे नुकसान

वांगी बुद्रुक मध्ये एक तर पाऊस तर दुसरीकडे लाख कॅनॉल ने शेकडो एकर पिकाचे नुकसान
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे अति पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप पिके कापूस, सोयाबीन, मका हे एक मुळीचे पीक पाण्याखाली गेली आहेत. त्यातच लाख कॅनॉलचे काम अपूर्ण असल्याने त्यात पावसाचे पाणी भरल्याने कॅनॉल तुडुंब झाला. आधीच पावसाची रोजची हजरी आणि चढ माथ्यावर भरलेला कॅनॉल, हेच पाणी शेकडो एकर पिकाची वाट लावत आहे.
त्यातच या बंद कॅनॉलमध्ये कॅनॉल कडीच्या शेतकऱ्यांनी विहीर, बोर उपसा होण्यासाठी लाख कॅनॉल मध्ये विद्युत मोटारी चालू केल्या. वांगी बुद्रुक लोक वस्तीमध्ये कॅनॉल फुटल्याने आदिवासी झोपडपट्टीमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल. गावातील सरपंच ज्ञानेश्वर बिडगर तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल चितळकर ग्रामसेवक सौ बाचकर व इतर नागरिकांनी तत्परता दाखवत, जेसीबी च्या साह्याने तो फुटलेला कॅनॉल पूर्वस्थितीत केला म्हणून मोठा अनर्थ टळला. परंतु याच आडमुठ्या काही शेतकऱ्यांमुळे बाकीच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत रुद्रा न्यूज संपादक नारायण चोरमले, अमोल कांबळे, सखाराम पिसाळ, काका निकम व इतर शेतकरी यांनी, इरिगेशन विभाग कार्यकारी अभियंता अहिल्यानगर स्वप्निल काळे यांना फोन द्वारे लाख कॅनॉल मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याबाबत माहिती दिली.
यावर काळे यांनी लागलीच कारेगाव डिव्हिजनला याबाबत माहिती देऊन पुढील कार्यवाही करण्यास सूचना दिल्या. समक्ष पाहणी साठी कारेगाव गटाचे शाखा अधिकारी भांगरे, प्रशांत खोत, कोकणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबरोबर कॅनॉलची पाहणी करून, लगेच पाणी काढून देण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात रुद्रा न्यूज संपादक नारायण चोरमले, सरपंच ज्ञानेश्वर बिडगर, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब चितळकर अमोल कांबळे, सखाराम पिसाळ, काका निकम, चितळकर व इतर शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश आले.



