ब्रेकिंग

अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांच्या ठेवी सुरक्षित आहेत, ज्ञानराधा बँकेच्या व्यवस्थापकांचा विश्वास.

अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांच्या ठेवी सुरक्षित आहेत, ज्ञानराधा बँकेच्या व्यवस्थापकांचा विश्वास.

 

बीड गेवराई येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा उठवली जात आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, बीड जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ज्यांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकता. फक्त गर्दी करू नका आणि शिस्तीमध्ये घेवून जावा असे आवाहन ज्ञानराधा बँकेचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपासणी करत आहेत. त्या पार्श्वंभूमीवर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर काही अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध लावून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी आज दिवसभर मोठी गर्दी करत आहेत. तुमच्या ठेवी आहेत त्या काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि तुम्ही जेव्हा बँकेमध्ये काढून घेण्यासाठी येताल तेव्हा त्या ठेवी आपणास सन्मानाने परत मिळतील. कारण बँक सुस्थितीमध्ये आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, ठेवीदारांना एकच विनंती आहे आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका, शिस्तीमध्ये काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा, आपल्या ठेवी काढून घेताना कोणतीही आडकाठी मध्ये येणार नाही हा विश्वास बँकेचे व्यवस्थापक हाडुळे यांनी दिला.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे