सुजाता स्कुल सोनईच्या विद्यार्थ्यांची विविध मैदानी खेळात जिल्हास्तरीय निवड*_

_*सुजाता स्कुल सोनईच्या विद्यार्थ्यांची विविध मैदानी खेळात जिल्हास्तरीय निवड*_
नेवासा तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सुजाता स्कुल सोनई च्या विद्यार्थ्यांचे यश,
मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा, खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.म्हणूनच सुजाता इंटरनॅशनल स्कुल मध्ये मैदानी खेळाला आणि सांघिक खेळला अतिशय महत्त्व दिले जाते आणि विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित केले जाते दरम्यान आज अहमदनगर नगर जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर आयोजित नेवासा तालुका शालेय क्रीडा स्पर्धा सोनई येथे पार पडल्या त्यात _*शिंदे निलेश बबन*_ (इयत्ता-12 वी) या विद्यार्थ्यांने भाला फेक या खेळ प्रकारात तर _*येळवंडे शाम चंद्रकांत*_ (इयत्ता -12वी) या विद्यार्थ्यांने लांब उडी या खेळ प्रकारात यश मिळवले त्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली त्याचे शाळेचे संस्थापक श्री.किरण सोनवणे सर व प्राचार्या ज्योती सोनवणे मॅडम यांनी अभिनंदन केले आणि जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थी खेळाडूंना स्पोर्ट टीचर निकिता गवते मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सांघिक व मैदानी खेळ तज्ञ प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन देऊन खेळाडू विविध स्पर्धेसाठी सुजाता स्कुल मध्ये तयार केले जातात तसेच विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी एक महत्त्वाचा पर्याय परिसरात सुजाता स्कुल च्या रूपाने पुढे येत आहे असे मानले जात आहे.