विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे निपुण भारत FLN (माता गटकार्य बाबत)अंतर्गत विभागस्तर समितीची बैठक संपन्न.

विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे निपुण भारत FLN (माता गटकार्य बाबत)अंतर्गत विभागस्तर समितीची बैठक संपन्न.
टाकळीभान प्रतिनिधी-विभागीय आयुक्त,नाशिक यांच्या अध्यक्षेतेखाली निपुण भारत (FLN) अंतर्गत नाशिक विभाग सुकाणू समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीस विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि प्रथम संस्थेचे प्रतिनिधी समिती सदस्य म्हणून उपस्थित होते. निपुण भारत अंतर्गत महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात सुकाणू समितीचे गठन यापूर्वी करण्यात आलेले होते. शिक्षणात माता पालकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. २९ जुन २०२२ च्या शासन निर्णयानुसार माता गटाच्या सहभागाने विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान बाबत क्षमता प्राप्त होणे गरजेचे आहेत. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळा, गाव व वस्ती स्तरावर इयता १ ली ते ३ री च्या सर्व विद्यार्थ्यांचे माता गट बांधणी करून मातांचे गट तयार केले जात आहेत.
विभाग स्तर समितीच्या बैठकीत २९ जून च्या शासन निर्णयानुसार गाव/ मोहल्ला,वाडी आणि वस्तीवर माता- पालक गट कार्यबाबत पुढीलप्रमाणे आपल्या शाळास्तर नियोजन केलेले आहे. या अभियानात यात आतापर्यंत ४ हजार २०१ शाळा अंतर्गत 13330 मातागटाची आणि ७४ हजार मातांची नोंदणी झालेली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी शासन स्तरावर हि नोंदणी सुरु राहणार आहेत. बैठकीत याबाबत सविस्तर सादरीकरण शिक्षण उपसंचालक श्री. बी.बी. चव्हाण यांनी केले
आपल्या शाळा/ गावातील अंतर्गत प्रत्येक मोहल्ला/ वस्ती निहाय इयत्ता १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांच्या माता-पालक गट बांधणी करावी. प्रत्येक गटानुसार ५ ते ६ माता असावेत.
प्रत्येक गटासाठी लीडर माता निवडणे.
शाळास्तरावर इयत्ता १ली ते ३री च्या विद्यार्थ्यांच्या सर्व मातांचा whats App Group तयार करणे.
मातांच्या गटात १५ सप्टेबर २०२२ पासून नियमित दर आठवडयाला आईडिया/ व्हिडीओ पाठविणे.
शाळा स्तरावर दर महा सर्व मातांची आढावा बैठक व कार्यशाळा घेणे तसेच शिक्षकांकडील कृती मातांना देणे.
या उपक्रमाचे Photo व Activity संग्रहित करणे. नियमित तालुका/जिल्हा स्तरावरील whatsapp गटात पाठवणे तसेच राज्यस्तरीय लिंकवर अपलोड करणे.
ओम इयत्ता १ ली ते ३ री चे शिक्षकांनी माता गटांना करावयाचे मार्गदर्शन – सदर माता गटाची बांधणी करताना इ.१ ली ते इ. ३ री च्या माता पालकांचा एक गट करावा. हे गट गल्ली / वाडी/वस्ती नुसार बनविण्यात यावा. असे सर्व विद्यार्थ्यांच्या पटसंख्यानुसार सर्व गट बांधणी करावी. प्रत्येक गटात एक लीडर माता नेमावी. लीडर मातांनी गटातील इतर मातांना शिक्षकांनी पाठवलेल्या उत्कृष्ठ व्हिडीओतील कृती करुन घ्यायचे आहेत. तशाच कृती मातांनी घरी गेल्यावर मुलांकडून करुन घेणे अपेक्षित असेल.
निपुण भारत अभियान FLN अंतर्गत माता गट बांधणी आणि कार्य बाबत सविस्तर 29 जूनचा शासन निर्णय नुसार विभागात सध्या सुरू असलेल्या उपक्रम बाबत अवगत केले. बैठकीत विभागस्तर समिती गठीत करण्यात आली. जिल्हानिहाय PGI आणि NAS Data वर चर्चा केली.
जळगाव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डॉ. श्री पंकज आशिया यांनी मुलांच्या शैक्षणिक स्थिती बाबत पायाभूत क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. असे मत मांडले. मा. आयुक्त महोदयांनी प्रत्येक जिल्ह्याचा शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान बाबत शाळा स्तर सुरु असलेल्या उपक्रमाची मांडणी केली. त्यानंतर पुढील उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आल्या. जिल्हा स्तरावरून निपुण भारत अभियानाची प्रभावी अमलबजावणी बाबत सूचना सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या. जिल्ह्याच्या सुकाणू समिती अंतर्गत सहनियंत्रण समिती अंतर्गत विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत यात शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळोवेळी याबाबत अहवाल सादर करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांना विशेष मदत मिळत आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनासोबतच प्रथम चे देखील सहकार्य लाभत आहे. निपुण भारत अभियानात महाराष्ट्र असे पहिले राज्य आहे जे माता पालकांचा देखील सहभाग यात समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाने पहिले पाउल या कार्यक्रमाच्या माध्यमातून यापूर्वीच अडीच लाख गट स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार इयत्ता १ ली मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळाली. आता या अभियानात १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांच्या मातांचा सहभाग करून एक ऐतिहासिक चळवळ गुणवत्ता वाढीबाबत शासन स्तरावर सुरु आहे.
या बैठकीत उपस्थिती
.राधाकृष्ण गमे मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग.गंगाधरन डी .जिल्हाधिकारी , नाशिक श्जलज शर्मा जिल्हाधिकारी धुळे श्रीम.मनीषा खत्री जिल्हाधिकारी, नंदुरबार. अभिजित राऊत – जिल्हाधिकारी,जळगांव
श्रीम.लीना बनसोड .CEO नाशिक श्रीम.भुवनेश्वरी एस. CEO धुळे. डॉ. पंकज आशिया.CEO जळगाव
शिक्षण उपसंचालक- श्री बी.बी.चव्हाण साहेब.
प्राचार्य श्री. गौतम सर , नाशिक
बाबासाहेब बडे जेष्ट अधिव्याख्याता, नाशिक -नोडल अधिकारी.
श्री गणेश पाटील – विभागीय समन्वयक नाशिक (प्रथम) वंदना पटारे – विभागीय समन्वयक नाशिक (प्रथम) हेमलता ससाणे – राज्य उपक्रम प्रमुख (प्रथम)
समितीची बैठक नंतर मा शिक्षण उपसंचालक यांच्या दालनात बैठक झाली. माता गट कार्य बाबत विभागात प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्याला सर्व शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य आढावा बैठक आयोजित करावी असे मत व्यक्त केले. त्यानुसार पुढील आठवड्यात बैठक होईल.