आळंदीतील नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नगरपालिकेच्या आवाहन*-

*आळंदीतील नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नगरपालिकेच्या आवाहन*-
आळंदी नगर परिषदेने प्रसिद्धी पत्रा त दिलेल्या माहितीनुसार भामासखेड धरणातील क्षेत्रातून पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल निकामी झाल्याची माहिती दिनांक 21 3 2013 रोजी दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी मिळण्याचे सांगण्यात आले असून पुणे महानगरपालिकेला पर्यायाने आळंदी नगर परिषदेला भामा आसखेड क्षेत्रातून होणाऱ्या पाणीपुरवठा मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदर पुरवठा खंडित झालेला आहे त्याबाबत मनपाचे दुरुस्तीचे कार्य चालू असून दुरुस्ती लवकरात लवकर प्रयत्न करून मार्ग काढण्यात येत आहे, आळंदीकर ग्रामस्थांना आळंदी नगर परिषदेने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी पाणीपुरवठा अधिकारी श्री शिरगीरे यांच्यामार्फत सूचित केले आहे की आळंदीकर नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि प्रशासनात सहकार्य करावे खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर त्याबाबतच्या सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे भामा आतखेड येथील जॅकवेलमधून पूर्ववत पाणीपुरवठा होईल अशी माहिती आळंदी नगरपरिषद प्रशासनामार्फत देण्यात आली आहे प्रशासनात सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे