ब्रेकिंगमहाराष्ट्र

दीप अमावास्येला गटारी अमावास्या म्हणून हिणवणार्‍या धर्मद्रोही विचारांचे खंडण !*

*दीप अमावास्येला गटारी अमावास्या म्हणून हिणवणार्‍या धर्मद्रोही विचारांचे खंडण !*

*सर्व हिंदु बांधवांना विनंती !*

दीप *(दिवे धुण्याच्या)* अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करत आहेत. मुळात गटारी असा काही सण आपल्या धर्मात नाही. हे नामकरण दारुड्या टवाळ लोकांनी केले आहे.

आषाढ अमावस्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण मास चालू होत असल्याने आणि हा पवित्र मास मानला जात असल्याने असंख्य जण त्या काळात मांसाहर वर्ज्य करतात. काही जणांना पुढे महिनाभर, तर काही जणांना चातुर्मास संपेपर्यंत मांसाहर करायला मिळणार नसल्यामुळे गटारी अमावास्येच्या दिवशी दारू आणि मांसाहर यांचे सेवन केले जाते. या कुप्रथेचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात येते. या चुकीच्या प्रथेच्या विरोधात जागृती करणारा पुढील संदेश सध्या व्हॉटस् अ‍ॅप, फेसबूक यांसारख्या सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे. तो आमच्या बांधवांसाठी येथे आहे असा देत आहोत.

हल्ली या दिवसाला आपल्याला खरेतर लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी गटारी नावाने मिळत आहे. जेव्हा अन्य पंथिय आपल्याला गटारीचा अर्थ विचारतात तेव्हा आपलेच काही मित्र त्या दिवशी इतकी प्यायची की, गटारात पडून गटारे फुल झाली पाहिजेत, असे निलाजरे उत्तर देतात. आपल्या समाजातील चांगल्या प्रथा एकमेकांना दाखवण्याच्या स्पर्धेच्या या दिवसात आपण मात्र अशा फुशारक्या मारतो. वास्तविक आषाढ मासातील अमावस्येला मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. कारण –

*१.* या कुंद पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही.

*२.* हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली, तर सर्व निसर्गचक्रावरच विपरित परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

*३.* बाहेरच्या वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजवतांना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणार्‍याला त्रास होऊ शकतो.

*४.* अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.

*१. दीप-अमावास्या उत्साहात साजरी करून आपली संस्कृती जपुया !*

या सणाला घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण !

त्यामुळे या सणाला दीप अमावास्याच म्हणावे, अगदी चेष्टेने सुद्धा गटारी म्हणू नका. कोणीही या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात.

आजही या दिवशी महाराष्ट्र्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिट्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप-अमावास्या आपण सर्वांनी उत्साहात साजरी करूया आणी आपली संस्कृती जपुया.

*२. हिंदूंना आवाहन !*

हिंदूंनो ! वेळीच सावध व्हा, उद्या हे धर्मद्रोही म्हणतील, धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो. धर्म सांगतो की, या दिवशी भरपूर दारू प्यावी.

हिंदूंनी या सणाविषयी लोकांमध्ये जागृती करून या सणाला जे विकृत वळण लागले आहे, ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून आपल्या सण आणि संस्कृती यांचा मान राखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे.

✍️ *– एक हिंदु धर्माभिमानी* 🙏🚩

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे