–टाकळीभान येथील उपसरपंच कानोबा खंडागळे, 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन उपसरपंच पदाचा राजीनामा देणार,
सविस्तर वृत्त श्रीरामपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजले जाणारे राजकीय वळण देणारे टाकळी भान गाव म्हणून ओळखले जाते अशोक चे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात, विष्णुपंत खंडागळे ,अँड सर्जेराव कापसे ,उपसरपंच कानोबा खंडागळे मयूर पटारे हे सर्व नेते एकत्र येऊन माजी सभापती नानासाहेब पावर यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत एक मुखी सत्ता ताब्यात घेतली, दोन वर्ष ग्रामपंचायत कारभार कानोबा खंडागळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य खेळीमेळीचे वातावरण चालू होता, , परंतु गेल्या काही दिवसापासून या आघाडीत बिघाड झाल्याचे दिसत आहे , त्यामुळे कानोबा खंडागळे आता 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहे व उपसरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून जाहीर केले आहे ,त्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खलबत होण्याच्या मार्गावर आहे, व यामुळे आता सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे .