जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे येथे राष्टीय विज्ञान दिन उत्साहात साजरा*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे येथे राष्टीय विज्ञान दिन उत्साहात साजरा*
दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे येथे विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विज्ञान दिनानिमित्त शाळेमध्ये विज्ञान प्रात्यक्षिक व विज्ञान साहित्य यांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सत्यवान लोखंडे सर यांच्या हस्ते सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये झाले. उद्घाटन झाल्यानंतर प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती .ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तक आधारित प्रश्नांची मुलांना उत्तरे द्यायची होती. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. प्रश्नमंजुषा स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञान पाठ्यपुस्तक आधारित वैज्ञानिक आकृती काढण्याची स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढल्या.
दुपार सत्रामध्ये प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले होते. प्रत्येक वर्गाने प्रदर्शनास भेट दिली व विविध संकल्पना समजून घेतल्या. प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून प्रदर्शनासाठी उपस्थित ठेवले.
विद्यार्थ्यांनी विविध संकल्पनांचा वापर करून विविध प्रात्यक्षिके सादर केली. प्रात्यक्षिके सादर करत असताना, त्यासाठी वापरलेले साहित्य ,नोंदवलेले निरीक्षण, उपयोग याविषयीची विस्तृत माहिती विद्यार्थी सादर करत होते. प्रदर्शनासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक व विज्ञान संकल्पना आधारित चित्रे काढली होती. ही सर्व चित्रे प्रदर्शनासाठी ठेवलेली होती. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित आकर्षक पोस्टर निर्मिती केलेली होती. या आकर्षक पोस्टर्स ने प्रदर्शना चे सौंदर्य आणखीच वाढले. तइयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानाच्या संकल्पना आधारित तयार केलेले आकर्षक TLM प्रदर्शनाची शोभा वाढवत होते.. विविध विज्ञानाच्या प्रयोगासाठी वापरले जाणारे साहित्य याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून प्रदर्शनाच्या मध्यभागी हे साहित्य विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गशिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले. विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका व बॅकग्राऊंडसाठी आकर्षक स्लाईड तयार करणे व ऑनलाईन प्रश्नमंजुषा गुणांकन करण्याचे काम श्री. टेकाळे सर यांनी केले. तांत्रिक सहाय्य किरण सर यांनी केले. बेंचेस ची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शैला गावडे मॅडम यांनी सहकार्य केले. आजचा विज्ञान दिन यशस्वी करण्यासाठी विज्ञान कमिटीचे सदस्य श्री पांडुरंग आव्हाड सर, पुनम देशमुख मॅडम, पूजा नाईक मॅडम, विणा वेदपाठक मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.