ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने लवकरच कात टाकणार? आयएसओ मानांकनासाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने लवकरच कात टाकणार? आयएसओ मानांकनासाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न

 

 

बेलापुर (प्रतिनिधी) – लाभार्थी रेशनकार्ड धारकांना लाभाबरोबरच कामाची गुणवत्ता देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली आयएसओ मानांकनासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यातून आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार होवून लाभार्थींना ही याचा लाभ होणार आहे. शासनाच्या प्राधान्य सुची कार्यक्रमवरील हा एक प्रमुख कार्यक्रम असल्याने लवकरच सर्व स्वस्त धान्य दुकानरांकडून होत असलेल्या सहकार्यातून जिल्ह्याची सार्वजनीक वितरण व्यावस्था आयएसओ मानांकनास पात्र ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी व्यक्त केला.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह येथे जिल्ह्यातील नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक गोदामपाल धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी तालुकाध्यक्ष यांची आयएसओ मानांकन बाबतच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांढेकर, राजेंद्र राऊत, दत्तात्रय भावले, दिपाली तांबे व कार्यालयीन सहकारी मनिषा सचदेव आदि व्यासपिठावर उपस्थीत होते. 

सार्वजनिक वितरण प्रणालीस आयएसओ मानांकनाचे काम तीन स्तरावर होत आहे, तालुकास्तरीय पुरवठा विभाग, तालुकास्तरीय गोदाम व स्वस्त धान्य दुकान अशा तीन स्तरावर काम सुरू आहे. दुकानाची इमारत पक्के बांधकाम असणे आवश्यक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सारखेपणा व आकर्षकपणा यावा या करीता जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना एकच रंग असणार आहे, सर्वत्र एक सारख्या रंगाचे व आकाराचे फलक,तसेच सर्व धान्य दुकानदारांना ड्रेस कोड, तसेच ओळखपत्र असणार आहे, अद्यावत नोंद वह्या व विविध प्रकारचे रजीष्टर, पारदर्शक नमुना बरणी, परीसर व दुुकानातील स्वच्छता, वृक्षलागवड किंवा कुंड्यातील झाडे लावून परीसर सुशोभिकरण, लाभार्थींसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, उंदीर व घुशींसाठी पिंजरा किंवा इतर साधन व पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आग प्रतिबंधक यंत्र, स्मोक प्रतिबंधक यंत्र आदि सुविधा उपलब्ध करायच्या आहेत.

या आयएसओ मानांकरनाकरीता तालुकास्तरावर महसुल नायब तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली अव्वल कारकुन काम करणार आहे त्यासाठी तालुकास्तरावर धान्य दुकानदारांतून मंडल निहाय समन्वयक नेमुन कामाच्या प्रगतीचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करण्याबरोबरच कामाची पुर्तता करून घ्यायची आहेे. यासाठी दुकानदारांनी अज आपल्या दुकानच्या अवस्थेचा फोटो काढून ठेवायचा आहे व सुचनेनुसार केलेल्या बदलाचा फोटो काढायचा आहे.  

या बरोबरच लाभार्थींना डीजीटल सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यासाठी रोखीच्या व्यावहाराऐवजी स्कॅनर व स्वायप मशीनची सुविधा उपलब्ध करायची आहे. विविध प्रकारचे फलक लावताना त्यावर शिल्लकसाठी, प्रमाण, दर, पात्रलाभार्थींची संख्या, दक्षता कमीटीसदस्यांच्या नावाचा फलक, लाचलुुचपत कार्यालयाचा संपर्क क्रमांक, तपासणी अधिकारी यांचे नाव संपर्क क्रमांक, आरोग्य तपासणी प्रमाणपत्र, अन्न व औषध परवाना वजनमापांचे प्रमाणपत्र, शॉपअ‍ॅक्ट प्रमाणपत्र आदिं अद्यावत करावयाचे आहेत.शेवटच्या टप्प्यात सि सि टी व्ही स्मोक डिटेक्टर अग्निशामक यंत्रणा ही कामे करावयाची आहेत

जिल्ह्यातील 1884 दुकानात एक सारखे पण येण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकांनाना एकच रंग असावा, एक सारखे फलक, एकाच साईजचे व एकाच रंगाचे फलक व एक सारखा ड्रेसकोड यात एक सारखेपणा असल्यास राज्यात आपल्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल अशी सुचना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली. त्यास जिल्ह्यातील सर्व दुकानदार प्रतिनिधींनी दुजोरा दिला. 

या बैठकीस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग दरंदले, चंद्रकांत झुरंगे, सुरेश उभेदळ, शिवाजीराव मोहीते, कैलास बोरावके, बाबा कराड, सुखदेव खताळ, प्रकाश भोसले, बाळासाहेब दिघे, विश्वासराव जाधव, सतिष हिरडे, गोवर्धन वाघस्कर, आत्माराम कुंडकर, श्रीकांत म्हस्के, गुलाबराव पवार, राजेंद्र शेळके, श्री.आरगडे आदिंसह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थीत होते. 

या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी दुकानांना जुन महिण्यात उशीरानेे मोफतचे धान्य उपलब्ध झाले परंतू दि.2जुलैपासून ते धान्य पॉझ मशीनवर दिसत नसल्याने सर्वच दुकानात धान्यसाठा दुकानात पडून आहे, कार्डधारक दुकानात चकरा मारत आहेत, जिल्ह्यातील वितरण बंद आहे. काही दुकानात काही टक्केवारीत वितरण झाले परंतू उर्वरीत वितरण थांबल्याने त्यास मुदतवाढ मिळण्याची आवश्यकता असल्याची मागणी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी केली.

आपली मागणी रास्त आहे परंतू पहील्या व दुसर्‍या टप्प्यातील धान्य वाहतुकीत विस्कळीतपणा आल्यामुळे या अडचणी येत आहेत. आम्ही मुदत वाढीची मागणी केली आहे परंतू या वितरणास मुदतवाढ येण्याची शक्यता कमी असल्याने दुकानदारांनी आपल्या दुकानात जो धान्यसाठा शिल्लक आहे त्यातून वितरण सुरु करावे, मागील वितरणास मुदत वाढ आल्यानंतर ते ही वितरण करता येईल परंतू सध्या आहे ते वितरण सुरू करा, दुकाने बंद ठेवू नका अशी सुचना यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिल्या.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे