तर खासदार लोखंडेना परिणामांना सामोरे जावेच लागेल- खेवरे

तर खासदार लोखंडेना परिणामांना सामोरे जावेच लागेल- खेवरे
मी युट्युबर वाचले. पाहिले.पण खा. सदाशिव लोखंडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोडून जातील असे वाटत नाही. कारण खा. दिवंगत बाळासाहेब विखे पा. दादापाटील शेळके. खा.डॉ सुजय विखे पा.हे सहजासहजी खासदारकी पर्यंत पोहचले नाहीत.या पदासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. मात्र लोखंडे हे अवघ्या १७दिवसात प्रतिमा खराब असतांनाही ठाकरे यांच्यामुळे खासदार झाले. त्यांनी पक्षाला सोडू नये त्यांनी उध्दव ठाकरे यांना भेटावे अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. असा इशारा शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख पै. रावसाहेब खेवरे यांनी दिला. खेवरे म्हणाले संघटना. पक्ष. उद्धव ठाकरे हे अडचणीत आहेत.हे दुर्देव आहे. मात्र सत्ता व पदासाठी पक्ष सोडून गेल्यास खा. लोखंडे यांना त्याचा हिशोब द्यावाच लागेल. मी त्यांना विंनती केली की. असे काही करू नका.पक्ष सोडून जाण्याची वेळ नाही.गेल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल.असा इशारा दिला.