राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची अहमदनगर मुख्यालय येथे तडकाफडकी बदली; अन पुढे घडले असे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची अहमदनगर मुख्यालय येथे तडकाफडकी बदली; अन पुढे घडले असे.
राहुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांची आज तडका फडकी अहमदनगर येथील मुख्यालयात बदली करण्यात आली. या घटनेचे पडसाद राहुरी तालुक्यातील सामान्य जनतेसह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज दुपारी चार वाजे दरम्यान पिंटूनाना साळवे व सचिन साळवे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी काही महिन्यातच राहुरी तालुका हद्दीत अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद केले. छेडछाडीवर आळा घालण्यात त्यांना यश येत आहे. त्यांचे कामकाज हे उल्लखणीय असून अशा अधिकाऱ्याची राहुरी तालुक्याला नितांत गरज आहे.
त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. ही मागणी आता तालुक्यात जोर दारू लागली आहे. दराडे यांची बदली रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पिंटूनाना साळवे व सचिन साळवे यांनी दिला आहे.